आखती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे गॅस तुटवडा निर्माण झाला आहे. याचा परिणाम औद्याेगिक क्षेत्रावर झाला असून, अहिल्यानगर एमआयडीतील जवळपास 15 ते 20 कंपन्यांवर परिणाम झाला आहे. केवळ एक दिवस पुरेल एवढाच गॅससाठा असल्याने एका कंपनीतील जवळपास 500 कर्मचाऱ्यांना सुट्टी देण्याची वेळ कंपन्यांवर येणार आहे.अहिल्यानगर एमआयडीसीतील 9 ते 10 हजार कामगारांवर परिणाम हाेणार आहे. ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरात सर्वसामान्य घरातील कुटुंबांची पाेळी भाजी केंद्रे आहेत.ही सर्व केंद्रे बाजूबाजूला आहेत, ज्यांचा व्यवसाय गॅस सिलिंडरवर अवलंबून आहे. मात्र त्यांच्याकडे शेवटच्या 1 ते 2 दिवसाचा गॅस शिल्लक आहे.
तसेच यानंतर सिलिंडर मिळणार नाही असे एजन्सीकडून सांगण्यात आले आहे. सिलिंडर मिळाला तरी ताेटा सहन करून केंद्र सुरू ठेवावे लागणार आहे.त्यामुळे या युद्धातून सरकारने काही ना काही मार्ग काढावा, असे या पाेळी भाजी केंद्र चालकांचे मत आहे. आखाती देशांतील युद्धाची झळ आता साताऱ्यातील मिठाई व्यावसायिकांना बसू लागली आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर गेल्या तीन दिवसांपासून गॅस सिलिंडरचा पुरवठा बंद झाल्याने मिठाई आणि साखरगाठी तयार करणाऱ्या व्यावसायिकांचे माेठे नुकसान हाेत आहे.साताऱ्याची प्रसिद्ध साखरगाठ परदेशातही पाठवली जाते, मात्र यंदा गॅस टंचाईमुळे परदेशी ऑडर पाठवणार नसल्याचे देखील व्यावसायिक राऊत मिठाईवाले यांनी सांगितले.