कुत्रा माणसाचा पाय घेऊन पळाला...

    14-Mar-2026
Total Views |
 

dog 
 
सिमल्याच्या रस्त्यावर एक विचित्र घटना दिसून आली आणि सर्वच भयचकित झाले. एका माणसाचा कापलेला पाय ताेंडात घेऊन एक कुत्रा येथे रस्त्यावर धावताना दिसला आणि सर्वत्र गाेंधळ उडाला. हे भयानक दृश्य अनेक लाेकांनी माेबाइल कॅमेऱ्यात कैद केले आणि साेशल मीडियावर प्रसारितही केले, ज्यामुळे स्थानिक प्रशासन जागे झाले आणि तपास सुरू केला.हिमाचल प्रदेशची राजधानी सिमला येथील या भयानक घटनेच्या तपासात अखेर असे समाेर आले की, येथील सरकारी रुग्णालयात म्हणजे ‘अटल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सुपर स्पेशालिटी हाॅस्पिटल’मध्ये शस्त्रक्रियेनंतर एका रुग्णाचा कुजलेला पाय कापण्यात आला. त्यानंतर हा पाय एका पिशवीत गुंडाळून स्टाेअर रूममध्ये ठेवण्यात आला आणि स्वच्छता संस्थेला त्याची विल्हेवाट लावण्यास सांगण्यात आले. तथापि, स्टाेअर रूमचा दरवाजा चुकून उघडा राहिला आणि एक भटका कुत्रा आत घुसला. त्याने हा पाय हिसकावून घेतला आणि ताे पळून गेला. ही घटना केवळ रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे घडली, त्यात कुत्र्याने माणसाचा पाय घेऊन पळ काढला.