दिवसा स्वप्ने पाहण्याची सवय विचारांना दिशा देते

    13-Mar-2026
Total Views |
 

dreams 
 
स्वप्ने ती नव्हेत जी झाेपेत येतात, खरी स्वप्ने तीच जी आपल्याला झाेप येऊ देत नाहीत.’ माजी राष्ट्रपती डाॅ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचे हे विचार उघड्या डाेळ्यांनी पाहिल्या जाणाऱ्या स्वप्नांविषयी सांगतात. तरीही लाेक दिवास्वप्नांबाबत नकारात्मक दृष्टिकाेन बाळगतात आणि यांना फक्त मनातले मांडे समजतात. पण ही सवय आपल्या विचारांना नवी दिशा देते.डे-ड्रीमिंग म्हणजे काय? जेव्हा आपले मन काेणत्याही बाहेरच्या दबावाशिवाय सहजतेने आपल्या सुंदर भविष्याची कल्पना करते तेव्हा त्या मनाेदशेला दिवास्वप्न वा डे-ड्रीमिंग म्हणतात. विशेषत: अशी साेनेरी स्वप्ने, अनेक प्रकारच्या काैटुंबिक व सामाजिक बंधनात जखडलेल्या महिलेला जीवनात पुढे जाण्यासाठी प्रेरित करतात. मानसशास्त्रज्ञांच्या मते ही स्थिती रचनात्मकता व समस्याच्या निवारणाशी संबंधित असते. सामाजिक दबावामुळे आजही भारतीय महिला आपल्या सुखाविषयी विचार करू शकत नाही.
 
अशावेळी डे-ड्रीमिंगची सवय त्यांचा तणावदूर करते व विचार सकारात्मक बनवण्यास मदत करते.प्रेरणेचा स्राेत महिलांसाठी स्वत:साठी एक सुंदर स्वप्न पाहणे प्रेरणेचे महत्त्वाचे माध्यक आहे.उदाहरणार्थ रेल्वेअपघातात आपला एक पाय गमावल्यानंतर अरुणिमा सिन्हाने एव्हरेस्ट शिखरावर तिरंगा फडकवण्याचे स्वप्न पाहिले. तेव्हा अनेकजण हे अश्नय मानत हाेते, पण त्यांनी हे पूर्ण करू आदर्श कायम केला. डे -ड्रेमिंगच्या दरम्यान ब्रेनमधून एंडाेर्फिन नाचे हार्माेन रिलीज हाेतात.जे सुख व समाधानाचा अनुभव करवतात. अमेरिकन सायकाेलाॅजिकल असाेसिएशननुसान ही सवय माणसाला रचनात्मक हाेण्यात मदत करते व समस्यांचे उत्तर शाेधण्यासाठी प्रेरित करते. यासाठी उघड्या डाेळ्यांनी स्वप्न पाहणे यशाकडे टाकलेले आपले पहिले पाऊल आहे.संतुलनाने मिळेल यश नेहमी स्वप्नांच्या जगात हरवून राहण्याची सवय माणसाला वर्तमानापासून दूर करते.
 
यासाठी स्वप्ने पाहणे व ती साकार करण्याच्या दिशेने केल्या जाणाऱ्या प्रयत्नात संतुलन असणे अत्यंत आवश्यक असते. स्वप्ने पाहण्याच्या प्रक्रियेत नेहमी आपल्या लक्ष्यावर लक्ष केंद्रित करावे आणि ते मिळवण्यासाठी पूर्ण धैर्याने काम करीत राहा. आपण इतर काेणाची मदतही घेऊ शकता.साकारण्यासाठी लक्ष्य ठरवा डे-ड्रीमिंग महिलांच्या रचनात्मकता व कल्पनाशील प्रकृतीचा स्वाभाविक भाग आहे. ही सवय मानसिक तणाव कमी करण्यास, गुंता साेडवण्यास व याेग्य निर्णय घेण्यास सहायक असते. वैज्ञानिक रुपाने डे‘ड्रीमिंगचेतन व अवचेतन मामध्ये सेतूचे काम करते. ज्यामुळे भविष्याच्या याेजनांचे बीज मनात अंकुरते. तसे सतत डे-ड्रीमिंग करीत राहणे आपल्याला आळशी व सुस्त बनवू शकते. यासाठी स्वप्नांना याेग्य दिशेला न्यावे. आपण आपल्या भविष्याची कल्पना करा, पण ती साकारण्यासाठी व्यवहारी लक्ष्य ठरवा व सतत प्रयत्न करीत राहा. संतुलनच यश व मानसिक आराेग्याची किल्ली आहे.