काही लाेकांना गाेड खाण्याचे इतके वेड असते की, राेज काेणत्या ना काेणत्या निमित्ताने काही तरी गाेड खातच राहतात.जास्त गाेडखाण्यामुळे सर्वांत आधी दात खराब हाेतात. मग वजन वाढायला लागते.परिणामस्वरूप मधुमेह किंवा हृदयराेगाची श्नयता बळावते. जास्त गाेडामुळे सुस्ती येते. शरीराचे संतुलन बिघडते.संशाेधकांच्या मते जास्त गाेडाची सवय माेडायची असेल तर व्हिटॅमिन बी आणि सी चे सेवन वाढवावे. त्याचप्रमाणे मिठाईपेक्षा फळांना पसंती द्यावी आणि भाजीपाला भरपूर खावा. गाेडाची सवय कमी करायची असेल तर नियमितपणे व्यायाम करावा असेही संशाेधक सुचवितात.