डाेअरबेल वाजताक्षणी पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी शीला पळत दरवाजाकडे गेली आणि तिच्या लक्षात आले, की दरवाजाचे प्लायवूड फारच खराब झाले आहे. ते एवढे वाईट दिसत हाेते की त्याला कसे लपवावे, असा प्रश्न तिच्या मनात आला. पाहुणे जाईपर्यंत दरवाजापुढे असेच उभे राहावे किंवा काय, असा विचार तिला आला. घराचे मुख्य प्रवेशद्वार एवढ्या वाईट स्थितीत असणे हे फ्नत शीलासाठीच नाही; पण इतर कुणाहीसाठी लज्जास्पद आहे.बहुतेक लाेक इंटिरियर डेकाेरेशन करवून घेतेवेळी घराच्या मुख्य दरवाजाकडे जास्त लक्ष देत नाहीत. मार्बल, ग्रॅनाईट लावून आख्खे घर चकाचक बनवलेले असते. महागडे आणि कलात्मक फर्निचर बनवून घेतलेले असते.अँटिक शाे-पीस ठेवलेले असतात; परंतु मुख्य दरवाजाचा रंग हा इंटीरियरशी मिळताजुळता आहे का, याचा विचार लाेक करत नाहीत.
खरं पहिलं तर प्रवेशद्वार तुमच्या घराच्या दर्शनीय भाग असताे. म्हणूनच सबंध घराप्रमाणेच हा दरवाजाही सुंदर, आकर्षक असायला हवा.घराचे इंटिरियर बदलण्याचा विचार असेल तर मुख्य दरवाजाच्या डेकाेरेशनविषयीही विसरायला नकाेय. यासाठी इथे सांगितलेल्या काही गाेष्टी लक्षात ठेवण्यासारख्या आहेत.सीझन किंवा उत्सवाप्रमाणे तुम्ही दरवाजाचे डेकाेरेशन बदलू शकता. उदा. दिवाळीमध्ये पारंपरिक पद्धतीचे ताेरण लावू शकता.गणेशाेत्सवात आर्टीस्टीक फाॅर्मचा गणपती दरवाजावर बनवून घेऊ शकता. फुलांचा सीझन लक्षात ठेवून दरवाजाच्या बाजूंना फुले ठेवण्यासाठी एक लहानशी फुलदाणी ठेवता येईल, ज्याने राेज येता-जाता ताज्या फुलांचा सुगंध तुम्हाला आकर्षित करेल.मुख्य दरवाजाचे डेकाेरेशन पाहुण्यांचे स्वागत करेल असे असावे. यातून सकारात्मकता, आनंद व्य्नत हाेईल.
म्हणूनच दरवाजाचा रंग तसेच डेकाेरेशन हलक्या रंगाने करावे.लाकडी दरवाजा सामान्यतः बहुतेक सगळ्याच घरांमधे वापरला जाताे. म्हणूनच घराचा रंग लक्षात घेऊन इंटिरियरप्रमाणे त्याचे डेकाेरेशन करावे. उदाहरणार्थ, अँटिक लूक असणाऱ्या घरातील प्रवेशद्वारावर काॅपर रंगाचे हँडल किंवा डाेअरबेल चांगली दिसेल. डाेअरबेल म्हणून माेठ्या घंटेचा वापरही करता येईल. पेस्टल शेड्स कलरचे डेकाेरेशन असेल तर घरामध्ये स्टील, स्लिम हँडल शाेभून दिसेल.दरवाजाच्या बाजूमध्ये पुरेशी जागा असेल, तर तिथे शाेभेसाठी फुलराेपे लावू शकता. ते फार लहान नसावे. आणि त्याला ठेवण्यासाठीनक्षीदार मेटॅलिक किंवा मातीच्या कुंड्या मिळतात. यामुळे प्रवेशद्वार जरा वेगळे दिसेल.कलरफुल वातावरण बनवायचे असेल तर ही पद्धत स्वीकारता येईल; पण अशा फुलझाडांबद्दल पुरेशी काळजी घ्यावी लागते परंतु ऋतूनुसार तुम्ही हे बदलू शकता.