चेहऱ्यावर हास्य असण्याचे अनेक फायदे असतात

    10-Mar-2026
Total Views |
 
 

smile 
 
चेहऱ्यावर स्मितहास्य असणाऱ्या व्यक्तीकडे स्वाभाविकपणे आपले लक्ष जाते. हसरा चेहरा कुणाचेही मन प्रसन्न करताे. त्याचवेळी चेहऱ्यावरील रागीट, कुजकट आणि नकारात्मकता समाेरच्या व्यक्तीच्या मनात तुमच्यापासून लांब राहण्याची भावना निर्माण करते.
 
वेदना, दुःख कमी हाेते:हसण्यामुळे रक्तामध्ये एन्डाॅर्फिन्स तयार हाेतात आणि त्याचे चांगले साईडइफे्नटस् दिसू लागतात. त्यामुळे वेदना कमी हाेतात. हसण्यामुळे शरीर रिलॅ्नस हाेते आणि स्नायू दुखत असल्यास आराम मिळताे.
 
यशाचे प्रमाण वाढते: जी व्यक्ती नेहमी हसतमुख असते आणि जिच्या चेहऱ्यावर हास्य असते ती व्यक्ती यशस्वी हाेण्याची श्नयता जास्त असते असे अभ्यासात दिसून आले आहे. हास्यामुळे स्वाभाविकपणे व्यक्ती सकारात्मक वातावरणात राहते आणि तिच्या आजूबाजूलाही सकारात्मक, उत्साही वातावरण तयार करण्यास कारणीभूत ठरते. त्यामुळेच अशा व्यक्ती यशाची शिडी लवकर चढत जातात.
 
विश्वास वाढताे: अभ्यासातून असे सिद्ध झाले आहे की, प्रामाणिक हास्यामुळे समाेरच्या व्यक्तीचा तुमच्यावरील विश्वास वाढताे.तुमचे हास्य जितके निखळ आणि प्रामाणिक असते तितका समाेरच्या व्यक्तीचा विश्वास वाढताे. व्यवसाय आणि वैयक्तिक यशासाठी विश्वास निर्माण करणे आवश्यक असते.
 
चेहऱ्यावर हास्य का असावे यामागील वैज्ञानिक कारणे
: 1) हास्यामुळे तुम्ही आनंदी राहता.
2) तुमच्या मनातील चिंता कमी हाेतात.
3) चेहऱ्यावर हास्य असणाऱ्या व्यक्ती अधिक लाेकप्रिय असतात.
4) चेहरा प्रसन्न आणि हसरा असणाऱ्या अधिक कार्यक्षम असतात.
5) हसण्यामुळे चेहऱ्यांच्या स्नायूंना व्यायाम हाेताे.
6) हसतमुख व्यक्ती अधिक विश्वासार्ह मानल्या जातात.