साैदी अरेबियातील स्टेडियम : समुद्राच्या लाटांपासून प्रेरणा घेतलेले डिझाइन, 47 हजार प्रेक्षक क्षमता

    10-Mar-2026
Total Views |
 

SA 
साैदी अरेबियाने सन 2034 फिफा वर्ल्ड कपची तयारी आतापासूनच वेगाने सुरू केली आहे. यासाठी साैदीचे पहिले वर्ल्ड कपचे ठिकाण ‘अरामकाे स्टेडियम’ यावर्षी पूर्णपणे तयार हाेईल. याला देशाच्या पूर्व किनारपट्टीवरील अल खाेबर शहरात बांधले जात आहे. स्टेडियमचे डिझाइन समुद्रात उठणाऱ्या लाटांपासून प्रेरीत आहे. याचे छत आणि भिंती एकमेकांवर स्वार हाेणाऱ्या लाटांप्रमाणे बनविण्यात आले आहेत. ज्यामुळे ते किनारी भागाच्या साैंदर्यात वाढ करू शकेल. या स्टेडियममध्ये 47 हजार प्रेक्षक बसू शकतात.त्याबराेबरच सन 2029 पर्यंत साैदी अरबचे सर्वात माेठे स्टेडियम ‘किंग सलमान इंटरनॅशनल स्टेडियम’ सुद्धा बांधून तयार हाेईल. ज्याची क्षमता 92 हजार असेल. याच स्टेडियम मध्ये वर्ल्ड कपचा ओपनिंग आणि फायनल सामना खेळला जाईल. साैदी अरेबिया एकूण 5 शहरांमध्ये 15 स्टेडियम तयार करत आहे. त्यात अरामकाे स्टेडियम सर्वात आधी पूर्ण ंहाेणार आहे.