महामार्गावर वाहनांची विनाकारण हाेणारी तपासणी थांबवावी

    10-Mar-2026
Total Views |
 

road 
 
महामार्गावर वाहतूक पाेलीस वाहने विनाकारण थांबवून वाहनचालकांना त्रास देतात. अनेकदा अनधिकृत वसुली केली जात असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. हे प्रकार थांबविण्यासाठी सरकारने याेग्य ती कारवाई करावी, अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिराेळे यांनी विधानसभेत नुकतीच केली.केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने स्पष्ट निर्देश दिले आहेत की, जाेपर्यंत वाहतुकीच्या नियमांचे उघड उल्लंघन दिसत नाही, ताेपर्यंत केवळ कागदपत्रे तपासण्यासाठी गाड्या थांबवू नयेत. तरीही या नियमाचे उल्लंघन वाहतूक पाेलिसांकडून हाेत आहे, असे शिराेळे यांनी स्पष्ट केले.महामार्गावर टाेल नाक्यांच्या पुढे किंवा इतर काही ठिकाणी वाहतूक पाेलीस गाड्या थांबवून कागदपत्रांची विचारणा करतात.
 
डिजीलाॅकर किंवा एम-परिवहनवर कागदपत्रे असूनही ती मान्य केली जात नाहीत, तांत्रिक कारणे काढून प्रवाशांचा वेळ वाया घालवला जाताे. सीट बेल्ट, गाडीचा रंग, किंवा किरकाेळ तांत्रिक गाेष्टींवरून प्रवाशांना ताटकळत ठेवले जाते, हे त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.तूर्त जुन्या पद्धतीनेच वाहनांना परवाने द्या : शिराेळे पुणे आरटीओमध्ये केंद्र सरकारने अनिवार्य केलेले तपासणी केंद्र सुरू हाेण्यास तीन महिने लागतील. ताेपर्यंत जुन्या पद्धतीनेच वाहन तपासणी करून परवाने द्यावेत आणि वाहतूक व्यावसायिकांचे नुकसान टाळावे, अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिराेळे यांनी विधानसभेत केली.फेब्रुवारीपासून परवान्याअभावी वाहन चालकांना बँकांचे हप्ते, घर खर्च, मुलांच्या शाळांची फी, आदी खर्च भागविण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. ही काेंडी फाेडण्यासाठी आरटीओने जुन्या पद्धतीनेच (मॅन्युअल इन्स्पेक्शन) परवाने देणे सुरू ठेवावे, असे आदेश राज्य सरकारने आरटीओ कार्यालयाला तत्काळ द्यावेत, अशी मागणी शिराेळे यांनी केली.