माेबाइल बाजूला ठेवून एकमेकांसाठी वेळ काढणे गरजेच

    10-Mar-2026
Total Views |
 


mobile
 
 
 
सध्या माेबाइल फाेन हा जणू अनेकांच्या शरीराचा अविभाज्य भाग बनल्यासारखे झाला आहे. काही लाेक आपल्यापासून माेबाइलला जराही दूर हाेऊ देत नाहीत. काहीजण तर अगदी टाॅयलेटमध्येही माेबाइल फाेन बराेबर घेऊन जाताना दिसतात. इतके लाेकांना व्यसन लागले आहे. त्यामुळे काही लाेकांचे मानसिक आराेग्यही बिघडत आहे.माेबाइलपासून दूर जाण्याचे प्रयत्न सुरू माेबाइल माणसासाठी उपयुक्त आहे. पण, त्याचबराेबर त्याचे व्यसन लागू नये, यासाठीही काळजी घेणे गरजेचे आहे. यासाठी आता विविध प्रयाेग हाेऊ लागलेले दिसतात. स्क्रीन टाइम कमी करण्यासाठी जागृती हाेत आहे. माेबाइलपासून दूर राहण्यासाठी कुटुंबात, गावांत वेगवेगळे प्रयाेग हाेत आहेत.सांगली जिल्ह्यात वडगावमध्ये अनाेखा प्रयाेग सांगली जिल्ह्याच्या वडगावमध्येही असाच प्रयाेग करण्यात येत आहे. वडगावमध्ये संध्याकाळी सात वाजता डिजिटल डिटाॅक्ससाठी सायरन वाजताे.
 
त्यावेळी गावातील सगळी लाेकं स्वतःचा माेबाइल फाेन बंद करतात. त्यानंतर दीड तासांपर्यंत लाेक एकमेकांना भेटतात.शेजाऱ्यांशी बाेलतात. परिचित लाेकांना भेटायलाजातात. साडेआठ वाजता पुन्हा सायरन वाजताे.त्यानंतर लाेक पुन्हा त्यांचा फाेन हाती घेतात.
बिर्ला कुटुंबातही झाला हाेता असा प्रयाेग सुमारे 15-20 वर्षांपूर्वी उद्याेगपती कुमार मंगलम बिर्ला व त्यांच्या पत्नीची एक मुलाखत प्रसिद्ध झाली हाेती. प्रचंड व्यस्त कामामधून कुटुंबासाठी वेळ कसा काढता, याचे उत्तर देताना त्यांनी सांगितले हाेते की, आमच्या बिर्ला परिवारामध्ये अशी प्रथा आहे की रात्री आठ वाजता सगळ्यांनी स्वतःचा माेबाइल फाेन आईला द्यायचा! रात्री 8 ते 9.30 फक्त फॅमिली टाइम. दुसरं काहीच नाही.
 
रात्री सगळेजण जेवण घेताे. त्यानंतर पावणे नऊ ते साडेनऊ वाजेपर्यंत सगळे तिथंच बसून गप्पा मारताे. इतिहास, साहित्य आदी विविध विषयांवर गप्पा हाेतात. काैटुंबिक कार्यक्रमांचे प्लॅनिंग हाेते. आमच्या पूर्वजांविषयी नव्या पिढीला सांगताे. मग साडेनऊ वाजता सगळ्यांना स्वतःचा माेबाइल फाेन परत मिळताे.पुस्तक वाचण्यासाठी काढतात वेळ बिर्ला यांनी सांगितले की, रात्री प्रत्येकजण रूममध्ये गेल्यावर एखादे चांगले पुस्तक वाचतात. कारण दुसऱ्या दिवशी फॅमिली टाइमच्यावेळी त्याला त्या पुस्तकाबद्दल, जे वाचले आहे त्याबद्दल बाेलायचे असते.कुटुंबात पाच सदस्य आहेत. प्रत्येकजण आपल्या वाचनाबद्दल सांगताे.त्यामुळे सगळ्यांनाच पाच चांगल्या पुस्तकांविषयी ऐकायला मिळते.माेबाइल वापरण्याबद्दल नियम बनविणे गरजेचे अशा नियमांचे पालन प्रत्येक व्यक्तीने केले पाहिजे. दिवसातल्या काही वेळासाठी माेबाइल फाेनपासून दूर राहिले पाहिजे. माेबाइल फाेनचे मालक आपण असताे, पण बहुतांशी लाेकांनी माेबाइललाच स्वतःचा मालक केले आहे!