जर तुम्हाला लाेहयुक्त पदार्थ आणि पूरक आहार घेतल्यानंतरही चक्कर येत असेल आणि थकवा येत असेल, तर शरीर लाेह याेग्यरीत्या शाेषत नसण्याची शक्यता आहे.जर तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनात लाेहपूरक आहार (आयर्न सप्लिमेंट ) घेत असाल किंवा लाेहयुक्त पदार्थ खात असाल, पण तरीही सतत थकवा, डाेकेदुखी, केस गळणे किंवा चक्कर येणे यांसारख्या समस्या येत असतील, तर तुम्ही किती लाेह घेत आहात यामध्ये नसून तुमचे शरीर ते किती चांगल्या प्रकारे शाेषून घेत आहे यामध्ये असू शकते. लाेहाचे कमी शाेषण हे पूरक आहार घेतल्यानंतरही शरीरात लाेहाचे प्रमाण कमी राहण्याचे एक सामान्य कारण आहे.चांगली गाेष्ट अशी आहे की, तुम्ही काही साेप्या हॅक्स स्वीकारून लाेहाचे शाेषण सुधारू शकता. याबद्दल, पाेषण तज्ज्ञ आणि हार्माेन हेल्थ स्पेशालिस्ट शीख गुप्ता कश्यप यांनी काही प्रभावी उपाय सांगितले आहेत.
लाेहयुक्त पदार्थांमध्ये, विशेषतः पालक आणि बीन्स सारख्या वनस्पती आधारितपदार्थांमध्ये असलेले लाेह शरीराद्वारे सहज पचत नाही. जर लिंबू, आवळा, संत्री किंवा माेसंबी यासाेबत घेतल्यास ते लाेह विरघळवून रक्तात मिसळण्यास मदत करते.
चहा आणि काॅफीमध्ये असे पदार्थ असतात जे शरीराद्वारे लाेह शाेधण्यापासून राेखतात, ज्यामुळे लाेहाचे शाेषण 60 % पर्यंत कमी हाेते. म्हणून लाॅगयुक्त पदार्थ किंवा सप्लिमेंट्स खाण्यापूर्वी आणि नंतर किमान एक तास चहा आणि काॅफी टाळावी.
कॅल्शियम (दूध आणि त्याचे पदार्थ) लाेह शाेषण्यात अडथळा आणतात. जर तुम्ही आयर्नच्या गाेळ्या दुधाबराेबर घेत असाल तर त्याचा परिणाम फार कमी हाेताे. या दाेन्हींमध्येही एका तासाचे अंतर असायला पाहिजे.
थाॅयराॅईडचे औषध आणि लाेहाच्या गाेळ्या कधीही एकत्र घेऊ नयेत.
जर तुमच्या आतड्यांमध्ये जळजळ असेल तर शरीर तुमच्या रक्तात लाेह शाेषू शकत नाही. म्हणून तुमची पचनसंस्था सुधारणे महत्त्वाचे आहे.यासाठी तुम्ही फायबरयुक्त पदार्थ खावेत आणि प्राेबायाेटिक्स घ्यावेत.
जर तुमच्या पाेटात पुरेसे आम्ल (अॅसिड) तयार हाेत नसेल तर अन्नातील लाेह शरीरात समान प्रमाणात शाेषले जात नाही.
आयर्नचे स्राेत : पालक, बीट, मेथी, राजमा, छाेले, टाेफू, हलिमा बियाणे, तीळ, भाेपळ्याच्या बिया, नाचणी, गूळ या सर्वांमध्ये लाेहाचे प्रमाण चांगले असतात.