आलेयुक्त चहा : आलेयुक्त चहा हा स्वादालाही चांगला लागताे आणि डाेकेदुखीत आराम देताे.आलेयुक्त चहामुळे शरीरामधील रक्तवाहिन्यांतील सूज कमी करण्यास मदत हाेऊन वेदना कमी हाेते.त्यामुळे दरराेज आलेयुक्त चहा पिण्याची सवय लावा. त्यानं सामान्य आराेग्यही चांगलं राहातं.
पाणी प्या : शरीरातील पाणी कमी झाल्यानं म्हणजे डिहायड्रेशनमुळे बरेचदा डाेकेदुखी हाेते.अशाप्रकारची डाेकेदुखी अनेकांसाठी सामान्य बाब आहे मात्र नक्की डाेकं का दुखतंय हे अनेकांना कळत नाही. त्यामुळे यापुढे कधी अचानक डाेके दुखायला लागल्यास भरपूर पाणी प्या. कारण भरपूर पाणी प्यायल्याने सुद्दा डाेकेदुखीवर मात करता येते.
स्ट्रेच करून पाहा : अनेकदा नसांच्या किंवा स्नायूंच्या ताणामुळे डाेकेदुखी हाेते. अनेकदा पाठीचा वरचा भाग, मान, खांद्यावर ताण पडल्यास डाेकं दुखतं. त्यामुळेच साधेपणानं मानेचं स्ट्रेचिंग केल्यानं डाेकेदुखीवर आराम मिळताे. मान डावीकडे-उजवीकडे, वर-खाली सावकाशपणे फिरवल्यास शरिरातील अनेक स्नायूंची हलचाल हाेऊन ते थाेडे माेकळे हाेतात. मात्र अशाप्रकारे स्ट्रेचिंग करुन व्यायाम करताना मानेला लचका बसणार नाही याची काळजी घ्यावी.
गरम लवंग : डाेकेदुखी घालवण्यासाठी उत्तम उपाय म्हणजे लवंग. तव्यावर काही लवंगा शेकून घ्या. त्यानंतर गरम असतानाच या लवंग रुमालात बांधून घ्या. त्यानंतर या रुमालातून येणारा गरम लवंगांचाचा वास घेत राहा. यामुळे डाेकेदुखीचा त्रास नक्कीच कमी हाेईल.
अॅक्युप्रेशर करा : अॅक्युप्रेशर हा अनेक आजारांवरील उपाय आहे. अंगठा आणि तर्जनी म्हणजे पहिल्या बाेटाच्या मधल्या भागात असलेल्या स्थायूंवर एक मिनिटापर्यंत दाब द्या. अशाप्रकारे स्नायूवर याेग्य प्रमाणात दाब दिल्यामुळे डाेकेदुखीपासून सुटका हाेईल.
लिंबू पाणी : शरीरातील आम्लांचं प्रमाण कमी अधीक झाल्यास डाेकेदुखी हाेते.अशाप्रकारची डाेकेदुखी असल्यास लिंबूपाण्यात थाेडं मीठ किंवा खाण्याचा साेडा घालून ते प्यावं.लिंबू पाण्यामुळे शरीरातील आम्लांच (अॅसीडचं) प्रमाण संतुलित हाेतं.
बर्फाचा शेक : अनेकदा डाेक्यामधील नसांना सूज असल्यामुळेही डाेकेदुखी हाेऊ शकते.त्यामुळे कपाळ आणि कानाच्या जवळच्या भागावर बर्फाचा शेक दिल्यास फायद्याचे ठरते.एकंदरीत काेणता ऋतू आहे आणि वातावरणाचा अंदाज घेऊन शेक घ्यायचा की नाही, हे ठरवावे.
टरबूज खा : डाेकेदुखी असताना पाणीदार फळे खाणे फायद्याचे ठरते. त्यामुळेच टरबुजसारखं पाणीदार फळ खाल्यास वर नमूद केल्याप्रमाणे डिहायड्रेशनपासून हाेणाऱ्या डाेकेदुखीपासून मुक्तता मिळते. त्यामुळे टरबुज किंवा अन्य पाणीदार फळांचा आपल्या आहारात नियमित समावेश असल्यास ते आराेग्यासाठी फायद्याचे आहे.
दीर्घ श्वास घ्या आणि साेडा : ऑक्सिजनची कमतरता हेही डाेकेदुखीचे एक कारण असू शकते.त्यामुळे डाेके दुखत असल्यास जास्तीत जास्त ऑक्सिजन मिळेल अशा भरपूर झाडं असलेल्या भागात एखादा फेरफटका मारावा. हा फेरफटका मारताना माेठ्याने श्वास घ्यावा आणि साेडावा.डाेकेदुखी नक्कीच कमी हाेते.शेवटी, डाेकेदुखी ही आपल्या जीवनाचा एक भाग आहे, विशेषतः उन्हाळ्यात. बाजारात असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत जे तुम्हाला त्यावर प्रभावीपणे उपचार करण्यास मदत करतील. असा मार्ग निवडा जाे तुमच्या आराेग्याच्या समस्या निर्माण करणार ना