पुण्यासारख्या वेगाने विकसित हाेणाऱ्या शहरासाठी मजबूत पायाभूत सुविधा अत्यावश्यक आहेत. शहराला वाहतूक काेंडीतून मु्नत करण्यासाठी शासनाकडून बहुआयामी नियाेजन करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी (8 मार्च) सांगितले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या चाैकातील एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाचे लाेकार्पण रविवारी फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाइन करण्यात आले. त्यावेळी ते बाेलत हाेते. या प्रसंगी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर माेहाेळ, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, महापाैर मंजूषा नागपुरे, आमदार सिद्धार्थ शिराेळे, पीएमआरडीएचे आयु्नत डाॅ. याेगेश म्हसे उपस्थित हाेते.फडणवीस म्हणाले, विद्यापीठ चाैकातील जुना पूल पाडून नवीन दुमजली उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय घेताना अनेक अडचणी आणि मतभेद हाेते; मात्र सर्वांना विश्वासात घेऊन हा प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आला.
या प्रक्रियेत दिवंगत अजितदादांनी घेतलेला पुढाकार महत्त्वाचहाेता. या प्रकल्पाच्या सुरुवातीच्या काळात काही नागरिकांनी टीका केली हाेती; मात्र शहराच्या दीर्घकालीन हिताचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला हाेता. या संदर्भात अजितदादा एका भाषणात म्हणाले हाेते, आम्ही अभियंता नाही; मात्र अभियंत्यांनी दिलेल्या आराखड्यानुसार प्रकल्प वेगाने पूर्ण करणे हे आमचे काम आहे, असे स्पष्टपणे सांगत हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि आज त्याचे सकारात्मक परिणाम पुणेकरांना दिसत आहेत, असेही फडणवीस यांनी सांगितले.उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमाेरील हा एकात्मिक दुमजली उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला हाेणे हा पुणे शहरासाठी अत्यंत महत्त्वाचा क्षण आहे.
विद्यापीठ मुख्यद्वारासमाेर व गणेशखिंड रस्त्यावर हाेणारी वाहतूक काेंडी ही अनेक वर्षांपासून पुणेकरांसाठी माेठी समस्या हाेती. या समस्येवर दीर्घकालीन उपाय म्हणून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हा दुमजली उड्डाणपूल उभारण्यात आला आहे.केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासाेबत सातत्याने पाठपुरावा करून पुणे जिल्ह्यातील अनेक महत्त्वाच्या रस्ते प्रकल्पांना गती देण्यात अजित पवार यांचे याेगदान असल्याचे त्यांनी सांगितले.पुणे-शिरूर, हडपसर-यवत, तळेगावचाकण-शिक्रापूर; तसेच नाशिक फाटाखेड-राजगुरुनगर या महत्त्वाच्या मार्गांच्या विकासाला त्यामुळे गती मिळाली आहे.राज्याच्या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांसाठी 21 ट्न्नयांची वाढ करण्यात आल्याचे सांगून पवार यांनी नमूद केले की, पुणे जिल्ह्यासाठी मेट्राेच्या पुढील टप्प्यांना मंजुरी, रामवाडी-वाघाेली मेट्राे, येरवडा-कात्रज भुयारी मार्ग, हिंजवडी-शिवाजीनगर मार्गाचा डीपीआरतसेच विविध मार्गांचे सहापदरीकरण अशा अनेक विकासकामांमुळे पुण्याच्या विकासाला माेठी गती मिळणार आहे.
पुणे शहराला मुंबई महानगराच्या धर्तीवर ग्राेथ हब म्हणून विकसित करण्याची घाेषणाही या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे; तसेच आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सर्व महिला भगिनींना श्रीमती पवार यांनी शुभेच्छाही दिल्या.माेहाेळ म्हणाले, पीएमआरडीएच्या माध्यमातून सुमारे 277 काेटी रुपये खर्च करून 1 हजार 763 मीटर लांबीचा हा उड्डाणपूल उभारण्यात आला असून शिवाजीनगर, औंध, बाणेर आणि पाषाण परिसरातील वाहतूक काेंडी कमी हाेण्यास त्याचा माेठा फायदा हाेईल. राज्यमंत्री मिसाळ, महापाैर नागपुरे, स्थानिक आमदार शिराेळे यांचीही भाषणे झाली. डाॅ. म्हसे यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाला उपमहापाैर परशुराम वाडेकर, माजी आमदार सुनील टिंगरे, स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले, पुणे महापालिकेचे अतिर्नित आयु्नत पृथ्वीराज बी. पी., पीएमआरडीएच्या मुख्य अभियंता रियाज पठाण उपस्थित हाेत्या.