राज्य नाविन्यता साेसायटीला जर्मनीच्या शिष्टमंडळाची भेट : सहकार्याचे द्याेतक

    07-Feb-2026
Total Views |
 
 

visit 
जागतिक स्तरावर नाविन्यता परिसंस्था परस्परांशी अधिकाधिक जाेडल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर जर्मनीतील कार्लस्रुहे शहराच्या प्रतिनिधी मंडळाने राज्य नाविन्यता साेसायटीला दिलेली भेट ही महाराष्ट्र आणि जर्मनीत नाविन्यताधारित विकासाबाबत वाढत असलेल्या सहकार्याचे द्याेतक ठरली आहे. कार्लस्रुहे शहर अग्रगण्य तंत्रज्ञान व नाविन्यता केंद्र म्हणून ओळखले जाते. कार्लस्रुहेच्या व्यवसाय विकास विभागाच्या पुढाकारातून आयाेजिण्यात आलेल्या या भेटीचा उद्देश स्टार्ट अप्स, प्रगत उत्पादन, काैशल्यविकास आणि धाेरणाधारित उद्याेजकता या क्षेत्रांत दीर्घकालीन सहकार्याच्या संधींचा शाेध घेणे हा हाेता. या भेटीतील संवादादरम्यान दाेन्ही भागांतील स्टार्ट अप परिसंस्थेवर चर्चा करण्यात आली. साेसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. श्रीकांत पाटील यांनी दाेन्ही देशांतील सहकार्य बळकट करण्याची गरज व्य्नत केली. जर्मन प्रतिनिधी मंडळाने कार्लस्रुहे येथील नाविन्यता माॅडेलविषयी माहिती दिली.