दक्षिण दिशेकडे पाय करून का झाेपू नये?

    07-Feb-2026
Total Views |
 
 
 
 
sleep
 
वास्तुशास्त्रानुसार असे मानले जाते दक्षिणेकडे पाय ठेवून झाेपू नये. कारण त्यामुळे चित्रविचित्र स्वप्ने पडतात. हिंदू धर्मानुसार मृतदेह दक्षिण-उत्तर ठेवला जाताे. दक्षिण दिशा ही यमाची मानली जाते तथापि, उत्तरेकडे डाेके ठेवून झाेपलाे तर आपला मृत्यू हाेताे असे मानले जाते.झाेपण्यासाठी ही स्थिती याेग्य नाही, कारण पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र आणि मानवी शरीराचे चुंबकीय क्षेत्र यांच्यातील संबंध बहुधा आपल्या पूर्वजांना माहीत असावे. त्यांनी र्नतदाब आणि पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रांच्या प्रभावाने निर्माण हाेणाऱ्या इतर राेगांशी संबंधित हानिकारक परिणाम टाळण्यासाठी उत्तर दक्षिण न झाेपण्याचा हा नियम बनवलेला दिसताे.यामागील वैज्ञानिक कारण म्हणजे पृथ्वी दक्षिणाेत्तर ध्रृवाशी अक्षाने जाेडली आहे.
 
उत्तर गाेलार्धात राहताना जर डाेके उत्तरेकडे असेल तर चुंबकीय बलामुळे मेंदूकडे जास्त र्नत वाहते. ज्यामुळे झाेपेचा त्रास हाेताे. सात-आठ तास एकाच स्थितीत राहिल्यास चुंबकीय धु्रव आपल्या मेंदूवर अवाजवी दबाव टाकताे. त्यामुळे दीर्घ झाेपेनंतरही तुमची झाेप अपूर्ण राहते.तुम्हाला भीतीदायक स्वप्न पडणार नाहीत. पण त्याचा परिणाम आपल्या आराेग्यावर न्नकीच हाेईल.उत्तरेशिवाय काेणतीही दिशा ठीक आहे. विरुद्ध दिशेने म्हणजे पूर्वेकडे झाेपल्याने ऊर्जेचा प्रवाह सुरळीत हाेताे. पूर्वेकडून डाेके करून झाेपल्यामुळे निद्रानाशामुळे हाेणारी अस्वस्थता दूर हाेऊन चांगली झाेप घेता येते. अशाप्रकारे, मेंदू तटस्थ हाेते आणि तुम्हाला परिपूर्ण झाेप मिळते. हे सामान्य आराेग्य लाभांसह स्मरणश्नती आणि एकाग्रता वाढविण्यात देखील मदत करते.