नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प प्रभावीपणे राबवावा : अ‍ॅड. जयस्वाल

    07-Feb-2026
Total Views |
 
 
project
 
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पामुळे दुष्काळप्रवण भागातील कृषी अर्थव्यवस्थेला अधिक बळकटी मिळेल. हवामान सक्षम व शाश्वत शेतीसाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प 2.0 याेजना प्रभावीपणे राबवण्याचे सूक्ष्म नियाेजन करून त्यानुसार कार्यवाही करावी, असे निर्देश कृषी राज्यमंत्री अ‍ॅड.आशिष जयस्वाल यांनी दिले. नानाजी देशमुख कृषी संजीवनी कार्यालयाच्या सभागृहात अ‍ॅड. जयस्वाल यांनी या प्रकल्पाचा आढावा घेतला.यावेळी प्रकल्प संचालक परिमल सिंह, कृषी विभागाचे उपसचिव चंदनशिवे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित हाेते. केवळ शेतीच्या उत्पन्नावरच अवलंबून असलेल्या शेतकऱ्यास या प्रकल्पातील विविध याेजनांचा लाभ मिळवून देऊन त्याला आर्थिकदृष्ट्या सक्षम करावे. या याेजनेपासून लाभार्थी वंचित रहाणार नाही याची दक्षता घ्यावी, असे त्यांनी सांगितले. परिमल सिंह यांनी सादरीकरणाद्वारे याेजनेबाबतची माहिती दिली.