राज्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात पीएचडी, पदव्युत्तर पदवी व पदव्युत्तर पदविका या अभ्यासक्रमांचे शिक्षण घेण्यासाठी दरवर्षी शिष्यवृत्ती दिली जाते. 2026-27 या शैक्षणिक वर्षात 40 विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती याेजनेंतर्गत निवड केली जाणार असून, पात्र विद्यार्थ्यांनी तत्काळ ऑनलाइन अर्ज करावेत, असे आदिवासी विकास विभागाच्या आयु्नत लीना बनसाेड यांनी कळवले आहे.या शिष्यवृत्तीत शिक्षण व परीक्षा शुल्क, निर्वाह भत्ता (निवास व भाेजन), शैक्षणिक आकस्मिक, इतर खर्च, विमान प्रवास खर्च, व्हिसा शुल्क आणि आराेग्य विम्याचा समावेश असेल. शैक्षणिक आकस्मिक, इतर खर्च यूएस व इतर देशांसाठी (यूके वगळून) 1500 डाॅलर, तर यूकेसाठी 1100 जीबीपी इतका दरवर्षी देण्यात येईल.
विद्यार्थ्याच्या कुटुंबाचे उत्पन्न 8 लाख रुपये; तसेच विद्यापीठांची क्युस वर्ल्ड रँकिंग मर्यादा 200च्या आत असणे बंधनकारक आहे. विहित निकषांनुसार विद्यार्थी उपलब्ध न झाल्यास लाभार्थी विद्यार्थ्याच्या कुटुंबाची उत्पन्न मर्यादा 10 लाखांपर्यंत शिथिल केली जाईल, तर क्युस वर्ल्ड रँकिंग मर्यादा 200 पासून पुढे चढत्या क्रमाने 300 पर्यंत ग्राह्य धरण्यात येईल.TOEFL किंवा IELTS सारख्या प्रवेश परीक्षा उत्तीर्ण हाेणे विद्यार्थ्यांना अनिवार्य आहे. विहित नमुन्यातील अर्ज संकेतस्थळावर भरणे अनिवार्य आहे. अर्ज फ्नत ऑनलाइन स्वीकारले जातील.