‘राज्याच्या विकासात याेगदान देण्यासाठी कॅनडा उत्सुक आहे. कॅनडियन इन्फ्रास्ट्रक्चर बँकेच्या सहभागातून गृहनिर्माण व पायाभूत क्षेत्रातील दाेन महत्त्वाच्या प्रकल्पांत गुंतवणुकीद्वारे या सहकार्याची सुरुवात केली जाईल. कॅनडाच्या वित्तीय व तांत्रिक सहकार्यामुळे राज्यातील पायाभूत विकासाला नवी दिशा मिळेल,’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.‘वर्षा’ निवासस्थानी कॅनडा इन्फ्रास्ट्रक्चर बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ.सेबास्टियन यांच्याशी ऑनलाइन संवाद साधण्यात आला. यावेळी वित्त व नियाेजन विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी.गुप्ता, परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी, सार्वजनिक बांधकाम विभागाचेअपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव विकासचंद्र रस्ताेगी, नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव असीम गुप्ता, एमएमआरडीएचे महानगर आयु्नत डाॅ. संजय मुखर्जी, मुंबई महापालिकेचे आयु्नत भूषण गगराणी, सिडकाेचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंगल, मुख्यमंत्र्यांचे प्रमुख आर्थिक व गुंतवणूक सल्लागार काैस्तुभ धवसे, अभिनेता अजिंक्य देव व अतुल गुप्ता उपस्थित हाेते.महाराष्ट्रातील पायाभूत विकासासाठी कॅनडाच्या वित्तपुरवठा साखळीच्या माध्यमातून विविध तांत्रिक व आर्थिक उपाययाेजनांची एकत्रित अंमलबजावणी करण्यात येईल, अशी ग्वाही डाॅ. सेबास्टियन यांनी दिली.