नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमाने (एनएमएमटी) यंदा प्रवाशांना वाढीव फेऱ्यांची सुविधा पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. एनएमएमटीच्या ताफ्यात विजेवर धावणाऱ्या 295 बसपैकी 30 गाड्यांमध्ये तांत्रिक त्रुटी आढळल्याने प्रवासी फेऱ्या कमी झाल्या आहेत. यामुळे उपलब्ध बसवरील प्रवाशांचा भार वाढला असताना परिवहन प्रशासनाने सीएनजीवर धावणाऱ्या नव्या 150 बस खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.येत्या मार्चअखेरीस या बस ताफ्यात दाखल हाेणार आहेत. नवी मुंबई महापालिकेचे आयु्नत डाॅ. कैलास शिंदे यांनी एनएमएमटीच्या सक्षमीकरणासाठी मागील अर्थसंकल्पात ठाेस आर्थिक तरतूद केली हाेती.या अर्थसंकल्पात आयु्नतांनी नव्या बस खरेदीचा प्रस्ताव मांडला हाेता.
एनएमएमटीच्या ताफ्यात प्रशिक्षित वाहक-चालकांची पुरेशी संख्या आहे.त्यामुळे भाडे करारावर बस चालवण्याऐवजी नव्या गाड्या खरेदी करून उपलब्ध कर्मचाऱ्यांसह त्या वेगवेगळ्या मार्गावर सुरू करण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला हाेता.त्यानुसार सीएनजीवर धावणाऱ्या 150 नव्या बस खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला हाेता. या बस येत्या मार्चअखेरीस ताफ्यात दाखल हाेतील, अशी माहिती एनएमएमटीचे व्यवस्थापक याेगेश कुडूस्कर यांनी दिली. नवी मुंबईतील वेगवेगळ्या मार्गावर प्रवाशांची संख्या सातत्याने वाढत आहे.यासंबंधीचा सविस्तर आढावा आयु्नतांनी घेतला. त्यानुसार वाढीव बस काेणत्या मार्गावर साेडल्या जाव्यात, यासंबंधीचा प्रस्तावही तयार केला जात असल्याचे कुडूस्कर यांनी स्पष्ट केले.