ब्रिटनमधील दुकानातून हाेणाऱ्या लहान-सहान चाेऱ्या हे एक माेठे आव्हान बनत आहे. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (ओएनएस) दिलेल्या माहितीनुसार, इंग्लंड आणि वेल्समध्ये जून 2025 पर्यंत एका वर्षात चाेरीच्या प्रकरणात 13 टक्के वाढ झाली आहे. एकूण 5,29,994 तक्रारी दाखल झालेल्या आहेत. स्काॅटलंडमध्येही या काळात चाेऱ्यांमध्ये 15 टक्के वाढ झाली.तिथे 48,564 गुन्हे दाखल झाले. काेविड महामारीनंतर चाेरीच्या घटना वाढल्या आहेत. चाेरांच्या नव्या टाेळीने शाॅपलिफ्टिंग आंत्र्यप्रेन्याेर असे नाव देऊन त्याला राजराेस करण्याचा प्रयत्न केला आहे.चाेरीचा माल ऑनलाइन विकतात चाेर महागडे सामान चाेरतात.ऑनलाइन रिसेल साइटसवर तातडीने आणि सहजतेने विकून टाकतात.क्रिमिनाेलाॅजिस्ट प्राेफेसर एम्मेलिन टेलर यांनी सांगितले की, ख्रिसमससारख्या सणाच्या आधी चाेरी आणखीन वाढते.
कारण, चाेरीचा माल ऑनलाइन घेणाऱ्यांची मागणीही वाढते. साॅफ्ट टाॅयज, महागडे ब्रांडेड परफ्यूम, डिजायनर कपडे यांची चाेरी अधिक प्रमाणात हाेत असल्याचे दिसते.संघटित टाेळ्या करतात चाेरी चाेरी करणारे युवक नाहीत तर संघटित टाेळ्या बनवून काम करणारे मध्यमवयीन पुरुष आहेत. हे लाेक आधी चाेर नव्हते.पण, साेप्या मार्गाने कमाई करण्याच्या पद्धतीने त्यांना या मार्गावर आणले. स्टाॅकटन-ऑन-टीस इंग्लंडच्या काउंटी डरहम मधील एक ऐतिहासिक मार्केट टाउन आहे. येथे घाबरलेले रिटेल विक्रेता चाेरीच्या वाढत्या समस्यांशी सामना करत आहेत.पाेलिसांकडे कमी तक्रारी दाखल हाेतात रिटेल ए्नसपर्ट्सचे मत आहे की, सरकारी आकडे चाेरीचे खरे स्वरूप दाखवत नाहीत. ब्रिटिश रिटेल कंसाेर्टियमच्या मतानुसार, वर्षभरात चाेरीच्या सुमारे 2 काेटी घटना हाेत असतील. पण, 3 ट्न्नयांपेक्षा कमी चाेरीबद्दल पाेलिसांकडे केस दाखल हाेते.
चाेरीच्या प्रकरणातील खटले लांबू लागले लिबरल डेमाेक्रेटसच्या एका रिसर्चमध्ये कळले आहे की, 2024 - 25मध्ये 5.20 लाख प्रकरणांपैकी 2.90 लाख प्रकरणांमध्ये काेणत्याही संशयितांची ओळख न हाेता चाेरीचा तपास बंद करण्यात आला. तेच इंग्लंड आणि वेल्सच्या मॅजिस्ट्रेट काेर्टमध्ये एक चाेरीचे प्रकरण संपविण्यासाठी 2014 मध्ये 32 दिवस लागत हाेते.तेच 2024 मध्ये 59 दिवस लागू लागले आहेत.चाेरांच्या 63 टाेळ्यांनी पाच वर्षात 29 काेटींचे सामान चाेरले रिटेल से्नटरशी संबंधित लाेकांनी सांगितले की, आता संघटित टाेळ्यांच्या उदयामुळे चाेरीच्या पद्धतीतही बदल झाला आहे.नॅशनल बिझनेस क्राइम साेल्यूशन (एनबीसीएस) 63 सारख्या टाेळ्या पूर्ण ब्रिटनमध्ये सक्रिय आहेत. त्यांनी गेल्या पाच वर्षात कमीत कमी सुमारे 29.05 काेटी रुपयांचे सामान चाेरले.या टाेळ्यांमधील 26 युके आणि आयर्लंडच्या आहेत, तर बाकीच्या पूर्व युराेपीय देशांमधील आहेत.