नवी मुंबई विमानतळावर सेवांचा विस्तार; 24 तास सेवा सुरू : उड्डाण संख्याही वाढणार

    05-Feb-2026
Total Views |
 

Mumbai 
 
नवी मुंबई विमानतळ फ्नत 12 तासांसाठी सुरू हाेते; परंतु 1 फेब्रुवारीपासून या विमानतळवारील सेवा 24 तास सुरू ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे विमानतळावरील उड्डाणांची संख्या लवकरच वाढणार आहे. अद्याप रात्री उशिराच्या काेणत्याही विमानांचे वेळापत्रक निश्चित झालेले नसले तरी लवकरच मध्यरात्रीच्या सेवाही सुरू करण्यात येतील. सध्या नवी मुंबई विमानतळावरील शेवटचे विमान रात्री 9.50 ला उड्डाण घेणार असून, पहिले उड्डाण सकाळी 7.10 ला हाेणार आहे. उन्हाळी वेळापत्रक सुरू झाल्यावर उड्डाणांची संख्या वाढेल.सध्या प्रतितास 10 विमानांची हालचाल असलेली संख्या येत्या एप्रिलपर्यंत दुपटीहून वाढेल, असा विश्वास विमानतळ प्रशासनाने व्य्नत केला आहे. नवी मुंबई विमानतळाने 12 जानेवारीस महत्त्वाचा टप्पा पार केला. विमानतळ सुरू झाल्यापासून फ्नत 19 दिवसांत 1 लाख प्रवाशांनी प्रवास केला हाेता. या विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढतेच आहे. एप्रिलनंतर ही संख्या लक्षणीयरित्या वाढेल, असा विश्वासही प्रशासनाने व्य्नत केला आहे.