नृत्य करा : तंदुरुस्त राहण्यासाठी खूप जास्त घाम गाळण्याची गरज नाही. फक्त मनसाेक्त नाचलात तरी पुष्कळ आहे. नृत्य करणे हेदेखील उत्तम एराेबिक व्यायाम आहे. नृत्य कुठलेही असाे त्याचा आराेग्याला फायदाच हाेताे. नृत्यादरम्यान आपण 100 ते 400 उष्मांक जाळू शकताे. शरीराची ठेवण याेग्य करण्यासाठी डान्स एराेबिक अत्यंत उत्तम व्यायाम आहे.नृत्यातून व्यायाम हाेताे. कारण, आपल्या आवडीच्या गाण्यांवर आपण नाचत असताे, त्यामुळे कंटाळा येत नाही. तसेच शरीरातील सर्वच स्नायू आणि अवयव त्यात क्रियाशील हाेतात.त्यामुळे नृत्य केल्याने चयापचय वाढते.
दाेरीच्या उड्या : दाेरीच्या उड्या हा सर्वात साेपा आणि चांगला व्यायाम आहे. काही मिनिटे दाेरीच्या उड्या मारल्यास संपूर्ण शरीराला व्यायाम हाेताे. वेगाने वजन कमी करायचे असेल आणि हृदय चांगले ठेवायचे असेल, तर दाेरीच्या उड्या लाभदायक ठरतात. दाेरीच्या उड्या या कुठेही आणि केव्हाही मारता येतात. त्यामुळे हृदयाची कार्यक्षमता वाढते. तसेच हृदयाचा विविध विकारांपासून बचाव हाेताे. दाेरीच्या उड्या मारताना हृदयाचे ठाेके वाढतात, त्यामुळे फुफ्फुसांमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण अधिक वाढते आणि संपूर्ण शरीरात रक्तप्रवाह वेगाने वाढताे. त्यामुळे शरीरातील तणाव कमी हाेताे. शरीराचा प्रत्येक अवयव अधिक कार्यक्षमतेचे काम करताे.
जिना चढणे : जिना चढणे हादेखील उत्तम एराेबिक प्रकारातीलव्यायाम आहे. हा व्यायाम काेणाही करू शकताे. जिना चढ-उतार केल्यास हृदयाची रक्त शुद्धीकरणाच्या प्रक्रियेची गती वाढते. त्यामुळे संपूर्ण शरीरात रक्ताचा प्रवाह वेगवान हाेताे. धावल्याने जितकी ऊर्जा खर्च हाेते, त्यापेक्षा कितीतरी अधिक कॅलरीज् जिने चढ-उतार केल्याने खर्च हाेते. राेज आपण 7 मिनिटे जिना चढत असू, तर हृदयविकार हाेण्याची शक्यता 60 टक्क्यांपर्यंत कमी हाेते. त्याशिवाय राेज 2-3 मिनिटे जिने चढल्यास तिशीनंतर वाढणार्या स्थूलपणावरही नियंत्रण मिळवता येते.
पाेहणे : पाेहणे ही एक कला आहेच, पण ताे सर्वांगसुंदर व्यायामही आहे. आराेग्यासाठी हा व्यायाम अत्यंत उपयुक्त आहे. पाेहण्यामुळे अनेक प्रकारचे आजारांचा धाेका कमी हाेताे.पाेहण्यामुळे शरीरात रक्तप्रवाहाचा वेग वाढताे. तसेच तणाव आणि वेदना यांच्यापासून आराम मिळताे. रक्तप्रवाह वाढल्याने आपण तंदुरुस्त राहताेच, पण काेणतेही काम करताना खूप मन लावून केले जाते. पाेहण्याच्या व्यायामामुळे शरीराचा प्रत्येक भाग लवचिक हाेताे.