मुलांमधील डिजिटल व्यसनाच्या अभ्यासास टास्क फाेर्स नियु्नत करा : अ‍ॅड. आशिष शेलार

    04-Feb-2026
Total Views |
 
 

task 
 
मुलांमधील वाढत चाललेल्या डिजिटल व्यसनामुळे त्यांच्या मानसिक व शारीरिक आराेग्यावर हाेणाऱ्या दुष्परिणामांच्या पार्श्वभूमीवर या विषयाचा सखाेल अभ्यास करून त्यावर प्रभावी उपाययाेजना सूचवण्यासाठी तज्ज्ञांचा टास्क फाेर्स नियुक्त करण्याचे निर्देश माहिती तंत्रज्ञान मंत्री अ‍ॅड. आशिष शेलार यांनी दिले. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने 29 जानेवारीस प्रसिद्ध केलेल्या आर्थिक पाहणी अहवालात तरुण आणि अल्पवयीन मुलांमध्ये साेशल मीडिया व्यसनाचे वाढते धाेके अधाेरेखित केले आहेत. या अहवालात मुलांसाठी साेशल मीडिया वापरावर वयाेमर्यादा ठरवणे, तसेच अल्पवयीनांना उद्देशून असलेल्या डिजिटल जाहिरातींवर निर्बंध आणण्याची शिफारस करण्यात आली आहे. माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव वीरेंद्र सिंह यांना तज्ज्ञांचा टास्क फाेर्स नियुक्त करण्याबाबत लेखी निर्देश देण्यात आले आहेत. प्रस्तावित कार्यदलाच्या कार्यक्षेत्रात मुलांचे संरक्षण व सुरक्षितता, मानसिक आराेग्यावर हाेणारा परिणाम, डिजिटल प्लॅटफाॅर्मचा संतुलित व जबाबदार वापर, शिक्षण व एकूण विकासावर हाेणारा परिणाम, सांस्कृतिक व काैटुंबिक घटक, आदींचा समावेश करण्याचे निर्देशही अ‍ॅड. शेलार यांनी दिले आहेत.