शासकीय सेवेत आल्यानंतर विविध जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात.परिस्थितीनुसार निर्णय घेण्याची क्षमता, कामाचा प्राधान्यक्रम आणि सकारात्मकता शासकीय सेवा काळात महत्त्वाची असते. हे गुण अंगी बाळगून आपल्या सेवाकाळात कामाचा ठसा उमटवणे महत्त्वाचे असते, असे मत मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी व्यक्त केले. गृह विभागाचे सेवानिवृत्त अपर मुख्य सचिव इक्बालसिंह चहल यांच्या सेवानिवृत्ती निमित्त आयाेजित कार्यक्रमात अग्रवाल बाेलत हाेते. यावेळी गृह विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांच्यासह मंत्रालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित हाेते. महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, गृह विभागाचे प्रधान सचिव अनुपकुमार सिंग आणि राधिका रस्ताेगी म्हैसकर आदींनी चहल यांच्या कामाची वैशिष्ट्ये विशद करत त्यांच्या कार्याचा गाैरव केला.