काेकणच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या आंबा पिकाला यंदाही बदलत्या हवामानाचा माेठा फटका बसला आहे. देवगड तालुक्यात माेहर येऊनही अत्यल्प फळधारणा झाल्याने बागायतदार हवालदिल झाले असून, या संकटातून सावरण्यासाठी कृषी विभागाने उपाययाेजना सूचवल्या आहेत.नाेव्हेंबर अखेरीस देवगड तालुक्यात माेठ्या प्रमाणात माेहर येण्यास सुरुवात झाली हाेती. मात्र, हा माेहर प्रामुख्याने पालवी माेहर हाेता आणि ताे आकाराने लांब हाेता. 10 ते 15 डिसेंबर दरम्यान तापमानात तफावत दिसून आली. किमान तापमान 13 ते 15 डिग्री सेल्सिअस, तर कमाल तापमान 32 ते 35 डिग्री सेल्सिअसपर्यंत पाेहाेचले हाेते. या फरकामुळे माेहरात नर फुलांचे प्रमाण वाढले. परिणामी, परागीभवन याेग्य रितीने न झाल्यामुळे फळधारणा झाली नाही. डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात आलेल्या दुसऱ्या बहरातही फळधारणेचे प्रमाण कमी राहिले. सध्या अनेक ठिकाणी झाडांवर केवळ माेहराचे वाळलेले दांडे शिल्लक आहेत.