प्राण्यांतील गुणांपासून बरेच काही शिकता येईल

    04-Feb-2026
Total Views |
 
 
 

Health 
 
निरपेक्ष प्रेम आणि निष्ठा: माणूस कुठलीही गाेष्ट निरपेक्ष करत नाही. अगदी मदत केली तरी त्याने आपल्याविषयी कृतज्ञता व्य्नत करावी, अशी अपेक्षा ताे ठेवताे. याउलट मांजर, कुत्रा असे पाळीव प्राणी तुमच्यावर निरपेक्ष प्रेम करतात, कायम एकनिष्ठ राहतात. तुम्ही कसले कपडे घातले आहेत, कसे दिसता याच्याशी त्यांना काहीही देणेघेणे नसते. उलट तुम्हाला काही दुखले-खुपले, आजारी पडलात तर तुमचा कुत्रा तुमच्याजवळ बसून राहिल. तुम्ही ऑिफसमधून काम संपवून घरी गेलात, की हे पाळीव प्राणी तुमच्या स्वागताला आनंदाने हजर असतात.तुमचा मूड कसाही असला तरी ते तुमच्या पायात घुटमळून तुमच्यापर्यंत भावना पाेचवतात. जणूकाही सांगत असतात, की तुम्ही दिवसभर बाहेर गेल्यावर मी किती बैचेन हाेताे.पाळीव प्राणी आपल्या आनंदी ठेवतात असे संशाेधनातून सिद्ध झाले आहे.
 
उस्फूर्तता : सर्व काही उत्साहाने आणि उत्स्ूर्तपणे करणे हे पाळीव प्राण्यांचे वैशिष्ट्य असते. धमाल करणे, धावाधाव करणे त्यांना आवडते. हास्य हे जगातील सर्वांत चांगले औषध आहे हे त्यांना माहीत असावे. त्यामुळेच ते शेपूट हलवतील, खाेड्या करतील, तुम्ही नीट ठेवलेली वस्तू पुन्हापुन्हा पाडतील. यातून तुमची कळी खुलती आहे असे दिसले तर ते आणखी खूश हाेतात. त्यांच्याशी खेळताना तुम्हांला तुमचे काैशल्य पणाला लावावे लागततुम्ही त्यांच्याबराेबर मनसाे्नत खेळल्यावर तुमची ऊर्जा, उत्साह निश्चितपणे वाढलेला असताे.
 
उत्साह निर्माण करतात : प्राणी अगदी साधे जीवन जगत असतात. तुम्ही गाडीत बसवले, की रस्त्यावरची वाहतूक न्याहळत निघतात. बागेत नेले तर स्वतःबराेबरच तुमचे मन उल्हासित करतात. जमेल तेव्हा जमेल तेवढी झाेप हे त्यांचे आणखी एक वैशिष्ट्य. एक-दाेन मिनिटांची झाेप मिळाली तरी ती संधी साधून उठवल्यावर लगेच उत्साहाने उड्या मारू लागतात. जणू काही त्यांची ऊर्जा कधीच कमी हाेत नाही.