एआयही फेक न्यूज देऊ लागला; कंपन्यांचे काेट्यवधींचे नुकसान

    04-Feb-2026
Total Views |
 
 
 
fake
 
अमेरिकेतील मिनेसाेटामधील साेलर कंपनी वुल्फ रिवर इले्निट्रकचे ग्राहक गेल्या वर्षी धडाधड काॅन्ट्रॅ्नट रद्द करू लागले. 3 लाख 88 हजार डाॅलरचे काॅन्ट्रॅ्नट रद्द झाले. त्यामुळे कंपनीला सुमारे 200 काेटी रुपयांचे नुकसान झाले.गुगलवर आली हाेती फेक न्यूज चाैकशी केल्यावर ग्राहकांनी सांगितले की, गुगलवर बातमी वाचली की, कंपनीवर फसवणुकीचा खटला असून, सरकारशी बाेलणी सुरू आहेत.पण, कंपनीवर असा काेणताच दावा नव्हता. कंपनीबद्दलची ही खाेटी बातमी हटविण्यात कंपनीला यश आले नाही.शेवटी त्यांनी गुगलवर मानहानीची केस दाखल केली. त्याचबराेबर 900 काेटी रुपयांचे भरपाई मागितली. गुगलने सांगितले की,नवीन तंत्रज्ञानात चुका हाेणे श्नय आहे. आम्हाला कळल्यावर आम्ही त्यात लगेच सुधारणा केली.पण, त्यानंतरही गुगलवर वुल्फ रिवर कंपनीवर कायदेशीर कारवाई चालू असल्याचे दाखविण्यात येत हाेते.
 
वुल्फ रिवर इले्निट्रक कंपनीचे संस्थापक जस्टिन नील्सन यांनी सांगितले की, ग्राहकांचा विश्वास संपादित करण्यासाठी आम्हाला अनेक वर्षे लागली. पण, गुगलच्या खाेट्या बातमीनंतर ग्राहकांचा विश्वास पुन्हा संपादित करणे अश्नय आहे. जर लाेकांचा अविश्वास असाच राहिला तर कंपनी बंद करावी लागेल. अमेरिकेत खाेट्या बातम्यांचे गेल्या दाेन वर्षात 6 खटले अमेरिकेत गेल्या दाेन वर्षांत असे सुमारे 6 दावे दाखल झाले आहेत.त्यामध्ये आराेप केला आहे की, एआय टूल्सने खाेट्या आणि नुकसानकार गाेष्टी पसरविल्या आहेत.जबाबदारी काेणाची हे ठरवणे गरजेचे आता न्यायालयासमाेर महत्त्वाचा प्रश्न आहे की, जर मशीनने खाेट्या बातम्या पसरविल्या तर त्याची जबाबदारी काेणाची असेल?
 
सिरा्नयूज युनिव्हर्सिटीचे प्राेफेसर नीना ब्राउन यांनी याविषयी सांगितले की, एआयच्या खाेट्या बातम्यांसाठी काेर्टाने काेणत्या कंपनीला जबाबदार ठरवले तर अनेक नवीन केस सुरू हाेतील. अशा वेळी कंपन्या धाेका लक्षात घेऊन न्यायालयात येण्याआधीच प्रकरण मिटवून टाकतील.मेटाने राॅबी स्टारबक बराेबर असेच केले हाेते.एन्फ्लूएंसर स्टारबकचा खटला इन्फ्लूएंसर स्टारबकने 2004 मध्ये काेर्टात सांगितले हाेते की, मेटा एआय चॅटबाॅट लामाने एका पाेस्टमध्ये लिहिले हाेत की, ते 6 जानेवारी 2021च्या अमेरिकी संसद दंग्यांमध्ये सहभागी हाेते.पण, सत्य हे हाेते की, घटनेच्या दिवशी ते आपल्या घरी हाेते. मेटाने काेर्ट केसच्या आधी स्टारबकला एआय टीमचे सल्लागार बनविले.
 
खाेट्या बातम्यांमुळे हाेते मानसिक नुकसान आयर्लंडचे डीजे डेव फॅनिंगला एक दिवस कळले की, मायक्राेसाॅफ्टच्या एमएसएन पाेर्टलवर एका बातमीत त्यांच्या फाेटाेबराेबर लिहिले हाेते की, यांच्यावर याैन शाेषणाचे आराेप आहेत.ही बातमी भारतातील एका वेबसाइटने एआयकडून लिहून घेतली हाेती.त्याच्याबराेबर फॅनिंगचा फाेटाे लावला.मायक्राेसाॅफ्टने चाैकशी न करताच लेख एमएसएनवर टाकला. फॅनिंगने मायक्राेसाॅफ्ट आणि वेबसाइटवर केस दाखल केली.त्यांनी सांगितले की, यामुळे मला आतपर्यंत हादरवले. प्रचंड मानसिक त्रास झाला.