सागरी किनारा मार्गावर वेगाला ब्रेक!

    04-Feb-2026
Total Views |
 
 

coastal 
काेस्टल राेडवर गेल्या काही दिवसांत भरधाव वाहनांमुळे अपघाताच्या घटना घडत आहेत. यात एका तरुणीसह बंदाेबस्तावरील पाेलिसाचा मृत्यू झाला हाेता. काेस्टल राेडच्या बाेगद्यात काही वाहनांनी थेट 140 चा वेग गाठल्याचेही कारवाईतून समाेर आले. हा वेग नियंत्रणात आणण्यासाठी वाहतूक विभागाने कारवाईचा फास आवळला आहे. वारंवार नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध थेट गुन्हे दाखल करण्याचा इशाराही वाहतूक पाेलिसांनी दिला आहे.वाहतूक पाेलिसांनी 8 सप्टेंबर ते 12 जानेवारीदरम्यान वाहतूक पाेलिसांनी 61989 ई चालान बजावत काेट्यवधींचा दंड वसूल केला. अनेकदा चालकांचे या मार्गावर भरधाव वेगावरील नियंत्रण सुटते.ओव्हरटेकच्या नादात वाहने एकमेकांवर धडकली आहेत. तर दुसरीकडे, अनेक जण बस लेन, तसेच आपत्कालीन मार्गिकेवरून वाहने नेत असल्याने त्याचाही फटका काेंडीत भर घालून अपघाताला निमंत्रण देत आहे.
 
त्यानुसार या कारवाईत भरधाव वेग, बस लेनचा वापरसंबंधित कारवाईचा समावेश आहे.हे सर्व उल्लंघन एएनपीआर (ऑटाेमॅटिक नंबर प्लेट रेकग्निशन) कॅमेऱ्यांद्वारे टिपण्यात येत आहे. मुख्य काेस्टल राेडवर 80 कि.मी. प्रति तास, इंटरचेंजरवर 40 कि.मी. प्रति तास आणि बाेगद्यात 60 किमी प्रति तास, अशी वेगमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. रात्री उशिरा किंवा पहाटे जेव्हा रस्ता माेकळा असताे, तेव्हा सर्वाधिक वेगमर्यादेचे उल्लंघन हाेते.एएनपीआर कॅमेरे जुलैअखेरीस कार्यान्वित झाले, तर ई-चलन प्रणाली 4 सप्टेंबरला बाेगद्यांसाठी आणि 27 सप्टेंबरला संपूर्ण काेस्टल राेड प्रकल्पासाठी सुरू झाली आहे. दिवसाला 500 हून अधिक ई-चलन जारी करण्यात येत आहेत. सप्टेंबरमध्ये 16852 चलन जारी केले. नाेव्हेंबरमध्ये 12872 वर आला.पाेलिसांच्या धडक कारवाईमुळे वेगावर नियंत्रण मिळवण्यात यश येत आहे. त्यामुळे डिसेंबरमध्ये हा कारवाईचा आकडा 9909, तर जानेवारीत 3225 वर आला आहे. वेगमर्यादा उल्लंघनासाठी दाेन हजार रुपये आणि बस लेन वापरल्यास पहिल्या वेळी 500 रुपये, नंतर 1500 रुपये दंड.