उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी स्वत:चे दु:ख बाजूला ठेवून जाधव कुटुंबीयांचे सांत्वन केले

    04-Feb-2026
Total Views |
 

CM 
 
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुरक्षारक्षक विदीप जाधव यांचा बारामतीत झालेल्या विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. या दुःखद घटनेनंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी स्वतःचे दुःख बाजूला ठेवत दिवंगत विदीप जाधव यांच्या तरडगाव (ता. फलटण) येथील निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. दिवंगत जाधव यांच्या पत्नी व मुलांच्या डाेक्यावर मायेने हात फिरवत, काेणत्याही अडचणीत मी तुमच्या साेबत आहे, असा धीर देत त्यांनी जाधव कुटुंबीयास आधार दिला. या भावस्पर्शी भेटीने उपस्थितांचे डाेळे पाणावले. कर्तव्यपथावर असतानाही अत्यंत संयम व मायेने जाधव कुटुंबीयांचे दुःख हलके करण्याचा प्रयत्न करत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी संवेदनशीलतेचा आदर्श घालून दिला. दरम्यान, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी कराड येथील प्रितीसंगमावर महाराष्ट्राचे शिल्पकार आणि पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी पुष्पचक्र अर्पण करून विनम्र अभिवादन केले.