तीन विस्तारित महामार्गांच्या फेब्रुवारी अखेरपर्यंत निविदा काढणार

    03-Feb-2026
Total Views |
 
 

road 
 
नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या विस्तारीकरणाला वेग देण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी राज्य रस्ते विकास महामंडळाला (एमएसआरडीसी) दिले. त्यानुसार आता एमएसआरडीसीने नागपूर-चंद्रपूर, नागपूर-गाेंदिया आणि भंडारा-गडचिराेली या तीन विस्तारित महामार्गांच्या बांधकामासाठी फेब्रुवारीअखेरपर्यंत निविदा काढण्याचा निर्णय घेतला आहे.नागपूर-गाेंदिया आणि भंडारागडचिराेली महामार्गाचे 90 ट्नके भूसंपादन पूर्ण झाले आहे. लवकरच नागपूर-चंद्रपूर महामार्गाचेही भूसंपादन पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर या तिन्ही प्रकल्पांसाठी निविदा प्रक्रिया राबवून येत्या काही महिन्यांतच बांधकामाला सुरुवात करण्याचे एमएसआरडीसीचे नियाेजन आहे.समृद्धी महामार्गाचा विस्तार नागपूरचंद्रपूर, नागपूर-गाेंदिया आणि भंडारागडचिराेली असा करण्याचा निर्णय घेऊन या तिन्ही महामार्गांचे संरेखन अंतिम करण्यात आले. या तिन्ही महामार्गांच्या बांधकामासाठी निविदा मागवण्यात आल्या. 2024 मध्ये निविदा खुल्या करण्यात आल्या.
 
या निविदांना चांगला प्रतिसाद मिळाला आणि निविदेत तीन महामार्गांसाठी जी. आर. इन्फ्रा, गवार कन्स्ट्रक्शन, बीएससीजीएल इन्फ्रास्ट्रक्चर आदी कंपन्यांनी बाजी मारली. मात्र, निविदा 28 ते 40 ट्नके अधिक दराने प्राप्त झाल्याने निविदा प्रक्रियाच अडचणीत आली. त्याचवेळी या तिन्ही प्रकल्पांचे भूसंपादन पूर्ण झाले नसल्याने प्रत्यक्षात काम सुरू करण्यास बराच वेळ लागणार हाेता. त्यामुळे तिन्ही महामार्गांच्या निविदा रद्द करण्यात आल्या. त्यामुळे प्रकल्प लांबणीवर पडले.महत्त्वाचे म्हणजे नागपूर-चंद्रपूर महामार्गात माेठ्या प्रमाणावर वन क्षेत्र बाधित हाेणार असल्याने सुधारित संरेखन तयार करून वन क्षेत्र वाचवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे नागपूर-चंद्रपूर महामार्ग लांबणीवर पडला. आता हे तिन्ही महामार्ग मार्गी लागणार आहेत.मुख्यमंत्र्यांनी समृद्धी महामार्गाच्या विस्तारीकरणाच्या कामाला वेग देण्याचे आदेश एमएसआरडीसीला दिले.त्यानुसार आता एमएसआरडीसी कामाला लागणार आहे.