मिरा-भाईंदरमध्ये डाॅग पार्क उभारले जाणार; उड्डाणपुलाखालील जागा निश्चित

03 Feb 2026 20:33:42
 
 

park 
मिरा-भाईंदर शहरातील पाळीव श्वानप्रेमींसाठी स्वतंत्र डाॅग पार्क उभारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. यासाठी उड्डाणपुलाखालील जागा निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे प्राणीप्रेमींमध्ये समाधानाचे वातावरण आहे.मिरा-भाईंदरमध्ये माेकाट आणि पाळीव श्वानांची संख्या माेठी आहे. यात माेकाट श्वानांसाठी महापालिकेने निर्बीजीकरण केंद्र व पशू रुग्णालय उभारले आहे.
याशिवाय निवारा केंद्र उभारण्याचे कामही हाती घेण्यात आले असून, या श्वनांचे वेळाेवेळी लसीकरण करण्याचे काम प्रशासनाकडून केले जात आहे. दुसरीकडे पाळीव प्राण्यांना परवाने देण्याचे धाेरणही निश्चित करण्यात आले आहे. आता यात एक पाऊल पुढे टाकत पाळीव प्राण्यांसाठी डाॅग पार्क उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
 
यासाठी शहराच्या मुख्य मार्गावर नव्याने उभारण्यात आलेल्या मेट्राे पुलाखालील जागा ठरवण्यात आली असून, त्याबाबतचे कार्यादेश कंत्राटदाराला देण्यात आले. या पार्कमध्ये प्रामुख्याने पाळीव प्राण्यांसाठी विशेष सुविधा असणार आहेत. यामध्ये प्राणी शाैचालय, खाद्य कक्ष आणि खेळण्यासाठी स्वतंत्र खेळणी उभारली जातील. याशिवाय येथे श्वानांसाेबत येणाऱ्या नागरिकांसाठीही साेयी असतील, असे आयु्नत राधा बिनाेद शर्मा यांनी सांगितले.शहरात श्वान निवारा केंद्र उभारण्यासाठी महापालिकेने उत्तन येथील जिल्हाधिकाऱ्यांच्या ताब्यात असलेल्या जागेची निवड केली आहे. त्यामुळे ही जागा ताब्यात घेण्याच्या अनुषंगाने महापालिकेकडून शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात येईल. त्यानंतर निवारा केंद्र उभारण्याच्या दृष्टीने निविदा काढण्यात येणार आहे.
Powered By Sangraha 9.0