कुंभमेळ्यासाठी नाशिक रिंग राेडच्या कामांना वेगात सुरुवात

    03-Feb-2026
Total Views |
 
 

nasik 
आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर बाह्य रिंग राेडच्या उभारणीसाठी जिल्हा प्रशासनाला शेतकऱ्यांच्या जमिनींची आवश्यकता असून, या जमिनींच्या माेजणी प्रक्रियेला नुकतीच सुरुवात करण्यात आली. भूसंपादन कायद्यान्वये स्नतीचे भूसंपादन वेळखाऊ प्रक्रिया असून, प्रशासन 25 ट्नके अधिक माेबदल्यासह थेट खरेदीने जमिनी घेण्यास प्रयत्नशील आहे.देवळालीसह काही गावांत शेतकऱ्यांकडून माेजणीला विराेध झाला. त्यांच्याशी चर्चा करून दाेन दिवसांत समजूत काढण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर बाह्य रिंग राेडचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सरकार आणि जिल्हा प्रशासनाने हाती घेतला आहे.भूसंपादन आणि रिंग राेडच्या बांधणीसाठी सरकारने सुमारे सात हजार काेटींची तरतूद केली आहे. बाह्य रिंग राेड 66 कि.मी.चा असणार आहे. शहरालगतच्या काही गावांसह नाशिक, दिंडाेरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यांमधील सुमारे 18 गावांमधून हा रस्ता जाणार आहे.
 
शहरातील रस्त्यांवरील वाहतुकीचा भार कमी करणे आणि कनेक्टिव्हिटी वाढवणे हा या रस्ता बांधणीचा उद्देश आहे. यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्याचीतयारी जिल्हा प्रशासनाने सुरू केली आहे; परंतु या प्रकल्पासाठी आपल्या वडिलाेपार्जित जमिनी देण्यास काही ठिकाणी शेतकऱ्यांनी विराेध दर्शवला आहे. उपविभागीय अधिकारी शेतकऱ्यांशी संवाद साधून हा रिंग राेड नाशिकच्या विकासासाठी किती महत्त्वाचा आहे, यासह काेणत्या निकषानुसार माेबदला मिळणार याची माहिती देत आहेत.काही गावांत विराेध कायम असला तरी अनेक शेतकरी थेट खरेदीने जमिनी देण्यास तयार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. अशा शेतकऱ्यांच्या जमिनींच्या माेजणीला सुरुवात करण्यात आली. आडगाव, विहीतगाव, आंबेबहुला, पाथर्डी, पिंपळगाव खांब, पंचक, वडनेर दुमाला, माडसांगवी, विल्हाेळी, मुंगसरा, देवळालीसह संबंधित गावांत एकाच वेळी माेजणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आह