आयआयटी मुंबई रेल्वेचा कायापालट करणार

03 Feb 2026 20:36:43
 

IIT 
 
किफायतशीर आणि शहराच्या वाहतुकीचा कणा आहे. एमआरव्हीसी आणि आयआयटी मुंबईमध्ये जानेवारी 2025 मध्ये 2.5 वर्षांच्या संयु्नत अभ्यासासाठी करार करण्यात आला आहे. या अभ्यासात मुंबई महानगर प्रदेशातील उपनगरी रेल्वे संचालनाचा पुढील दहा वर्षांचा विचार करून सखाेल आढावा घेतला जाणार आहे. मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे सेवा, मेट्राे, बेस्ट बस, एमएमआरडीए आणि महापालिका यांच्या समन्वयाने अभ्यास केला जाईल.रेल्वेची भविष्यातील पायाभूत सुविधा गुंतवणूक, वाहतूक नियाेजन आणि प्रवासीसुविधांमध्ये सुधारणांबाबत आयआयटी मुंबई धाेरणात्मक शिफारसी करणार आहे.
 
या प्रकल्पासाठी प्रवासी, तज्ज्ञ आणि विविध भागधारकांकडून सूचना मागवण्यात येत असून, भविष्यात महामुंबईतील वाहतूक व्यवस्थेत उपनगरी रेल्वेची भूमिका कशी असावी, याबाबत सर्वांची मते जाणून घेतली जातील. आयआयटी मुंबईचा अंतिम अहवाल सादर झाल्यानंतर लाेकल सेवा विस्ताराबाबत, वातानुकुलित लाेकलच्या तिकीट दरांसह इतर अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जातील.
येत्या काही वर्षांत सामान्य लाेकलऐवजी टप्प्याटप्प्याने वातानुकूलित लाेकल चालवण्यात येईल. या लाेकलचे तिकीट दर, वेळापत्रक आणि सेवा विस्ताराचा आराखडा आयआयटीच्या अभ्यासातून निश्चित केला जाईल. मुंबई रेल्वे विकास महामंडळ (एमआरव्हीसी) आणि आयआयटी मुंबई यांच्याद्वारे वातानुकूलित लाेकलचे तिकीट परवडण्यासारखे करण्याबाबत अभ्यास केला जाईल.
Powered By Sangraha 9.0