जगभरात हाेणाऱ्या मुत्यूच्या कारणांमध्ये हृदयविकार (हार्ट फेल्यर) हे सर्वात अग्रस्थानी मानले जाते. सामान्यतः हार्ट-अटक किंवा हार्ट-फेल्यर म्हटले की काेलेस्टेराॅल किंवा उच्च रक्तदाब हीच मुख्य करणे समजली जातात. हृदयाच्या धमन्यांमध्ये काेलेस्टेराॅलचा ठार साचल्यामुळे किंवा रक्तदाब वाढल्यामुळे हृदयाला पुरेसा रक्तपुरवठा नाही आणि त्यामुळे हार्ट-अटॅक किंवा हार्ट-फेल्यरची अवस्था निर्माण हाेते.मार्ट अलीकडेच डाॅ. दिमित्री यारानाेव नावाच्या एका रशियन कार्डिओलाॅजिस्टने आपल्या संशाेधनात हार्ट-फेल्यर मागे प्रथिने अर्थात प्राेटिन्स देखील कारणीभूत असू शकतात, असे निरीक्षण नाेंदवले आहे.एका मुलाखती दरम्यान या डाॅक्टरांनी सांगितले की बहुतेक रुग्ण उच्च काेलेस्टेराॅल, उच्च रक्तदाब, पाठदुखी अशा कारणांमुळे एका क्लिनिकमधून दुसऱ्या क्लिनिकमध्ये भटकत असतात; पण प्रत्येक वेळी हृदयाच्या धमन्यांमधील ब्लाॅकेजच हार्ट-अटॅकचे मूळ कारण असते असे नाही. खरं तर अनेक वेळा खरे कारण अनडिटेक्ट म्हणजे ओळखलेच जात नाही.
डाॅ. दिमित्री यांनी हार्ट-अटॅकच्या मागे कारणीभूत ठरू शकणाऱ्या एका अतिशय कमी परिचित बाबीवर अनेक वर्षांनंतर पडदा उठवत, आपल्या संशाेधनाच्या आधारे सांगितले. ते म्हणाले की कार्डिएक एमिलाॅइडाेसिस नावाची एक अवस्था असते, ज्यामध्ये एका विशिष्ट प्रकारचे प्रथिन(प्राेटीन) हृदय कडक (स्टिफ) बनवण्याचे काम करते. कालांतराने हेच प्रथिन हृदयापर्यंत पाेहाेचवणाऱ्या रक्तपुरवठ्यात अडथळा आणते आणि परिणामी हार्ट-अटॅक हाेताे.एमिलाॅइड नावाचे हे प्रथिन हृदयामध्ये साचू लागते.अनेकवेळा हेच प्रथिन मूत्रपिंड (किडनी) आणि यकृत (लिव्हर) मध्येही साचू शकते आणि त्या अवयवांना नुकसान पाेहाेचवू शकते.
याच कारणामुळे आता हृदयतज्ज्ञ आहारामध्ये प्रथिनांचे अती प्रमाण टाळण्याचा सल्ला देत आहेत.
सतत थकवा जाणवणे, अशक्तपणा जाणवणे, पायांना सूज येणे, दम लागणे, छातीच्या भागात जडपणा किंवा दडपण जाणवणे अशी लक्षणे दिसून आली, तर हार्ट-अटॅक झालेले नसेल तरीही हे प्रथिन शरीरात साचत तर नाही ना? याची तज्ज्ञ डाॅक्टरांच्या सल्ल्याने एकदा तपासणी करून घेणे आवश्यक आहे. आज 30 आणि 40 व्या वयात हाेणाऱ्या हार्ट-अटॅकमध्येही प्रथिनांचे अती प्रमाण हे एक महत्वाचे कारण असू शकते,असे डाॅ. दिमित्री सांगतात.ते पुढे असेही नमूद करतात की तुम्ही ऍथलिट असाल, तुमच्याकडे सिक्स-पॅक ऍब्स असतील किंवा शरीरातील चरबीचे प्रमाण कमी असेल, तरी याचा अर्थ असा अजिबात हाेत नाही की तुम्हाला हार्ट-अटॅक येणारच नाही. विशेषतः इतर प्राण्यांपासून मिळणारे, म्हणजेच मांसाहारातून मिळणारी प्रथिने हृदयासाठी घातक ठरू शकते. यामुळे प्रथिनांची गरज प्लांट-बेस्ड (वनस्पतीजन्य) प्रथिनांमधून पूर्ण करण्याचा सल्लाही हे कार्डियाेलाॅजिस्ट देतात.