चाणक्यनीती

03 Feb 2026 20:09:28
 

chankya 
 
वाच्यार्थ : (नेहमी) प्रवास करणारी व्यक्ती, बांधून ठेवलेला घाेडा, रतिक्रीडावंचित स्त्री, उन्हात वाळत घातलेले कपडे या गाेष्टी लवकरच जुन्या (वृद्ध) हाेतात.
 
भावार्थ : अकाली वृद्धत्वाकडे नेणाऱ्या गाेष्टी खालीलप्रमाणे - 1. प्रवासात राहणारी व्यक्ती - काही व्यक्ती नाेकरी, व्यवसायाच्या निमित्ताने सतत प्रवास करतात. प्रवासात प्रदेश, हवा, पाणी बदलत राहते.बाहेरचे तेही वेळी-अवेळी खाणे, अपुरी झाेप आणि कामाचा शीण, आपल्या माणसांपासून दुरावा या आणि अशाच अनेक कारणांनी व्यक्ती प्रभावित हाेते.शरीरावर, तब्येतीवर या सर्वांचा (थशरी । ढशरी) परिणाम हाेऊन व्यक्ती वयापेक्षाही जास्त वृद्ध दिसू लागते. अनेक आजारही त्यांना जडतात.
Powered By Sangraha 9.0