प्रश्न : आपल्याला बाेट का लागते ?

03 Feb 2026 20:22:52
 
 

boat 
 
उत्तर : अनेकांना बाेटीत बसल्यानंतर च्नकर येते व ओकारीची भावना हाेते. असे सर्वांना हाेत नाही, तर फ्नत काही लाेकांना हाेते. हा प्रश्न ताेल राखण्याशी संबंधित आहे. आपला ताेल राखणाऱ्या काही इंद्रियांमध्ये काही ताठ केस असतात. या केसांभाेवती एक द्रव पदार्थ असताे. त्याला लसिका म्हणतात.जेव्हा आपण एका दिशेला सरकताे तेव्हा लसिका केसांना हलवते. हे केस मेंदूला संदेश पाठवतात. मग मेंदू त्या दिशेला सरकण्याची आपल्याला संवेदना देताे. सर्वसाधारणपणे हा द्रवपदार्थ व आपल्या देहातील केसांची गती आणि आपल्या हालचाली यांचा मेळ एकमेकांना सांभाळून असताे.हालचालींमधील बदल सहजपणे घडून येतात; पण जहाजावर असताना काय हाेते? डेकवर आपले स्थान आपली पावले बदलतात. लसिका मागे व पुढे हिंदकळत राहते. त्यामुळे संवेदनावाहक केस हिंदकळतात.
 
म्हणून मेंदूला उघड-झापीचे संदेश मिळत राहतात. हुकमापाठाेपाठ हुकूम पाठवले जातात. त्यामुळे मेंदूचा गाेंधळ हाेताे. मज्जासंस्थेच्या गाेंधळामुळे च्नकर येते व डाेके दुखू लागते. डाेळ्यांसमाेर काजवे चमकू लागतात, घाम फुटताे. शेवटी ओकारी हाेते! यालाच ‘बाेट लागणे’ असे म्हणतात.अशा वेळी आपल्या देहाचा ताेल सांभाळता येईल अशी जागा आपण पटकन शाेधली पाहिजे. म्हणजे मेंदूला संदेश पाठविण्याची क्रिया बंद केली पाहिजे. लसिका व केस यांची गती थांबविणे अश्नय आहे. मेंदूतील काही नसा बधिर करणे हा समुद्र आजारांवरचा दुसरा उपाय. जहाजाचा सर्वांत स्थिर भाग गाठणे व न घाबरणे हे आवश्यकच. ओकारीची अवस्था काही वेळा मानसिक असते!
Powered By Sangraha 9.0