कसबा बावडा येथील लक्ष्मी विलास पॅलेस या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जन्मस्थळी त्यांच्या जीवनकार्यावर आधारित वस्तुनिष्ठ संग्रहालय उभारण्यात आले आहे. ही वास्तू म्हणजे खऱ्या अर्थाने समतेचे प्रतीक आहे, असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी केले.या वास्तूचे लाेकार्पण करताना शेलार बाेलत हाेते. काेल्हापूरच्या महापाैर रूपाराणी निकम, खासदार छत्रपती संभाजीराजे, छत्रपती मालाेजीराजे, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाचे संचालक डाॅ. तेजस गर्गे, सहसंचालक डाॅ. विलास वाहणे, इतिहास संशाेधकइंद्रजीत सावंत, अखिल भारतीय मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक, इतिहास अभ्यासक प्रा. डाॅ रमेश जाधव आदी उपस्थित हाेते.
भारतीय मराठा लष्करी भूप्रदेश या काॅफी टेबल बुकचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच शाहू महाराज जन्मस्थळ लक्ष्मी विलास पॅलेस जतन व नियामक समितीअंतर्गत असणाऱ्या वस्तुसंग्रहालय उपसमितीतील सदस्यांचा शेलार यांच्या हस्ते ग्रंथ देऊन गाैरव करण्यात आला.यावेळी राजर्षी शाहू सलाेखा मंच आणि अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने दसरा चाैक ते शाहू जन्मस्थळदरम्यान ‘शाहू समता ज्याेत’ रॅलीचे आयाेजन करण्यात आले हाेते.