कुंभमेळ्यात गाेदावरीच्या स्वच्छतेसाठी क्लीन गाेदावरी बाँड्सद्वारे निधी उभारल्यानंतर नाशिक महापालिकेने आता पाणीपुरवठा याेजनेच्या विस्तारासाठी हरित महापालिका कर्जराेखे (ग्रीन म्युनिसिपल बाँड्स) विक्रीची घाेषणा केली आहे. या माध्यमातून 200 काेटी रुपये उभारले जाणार आहेत. या कर्ज राेख्यात गुंतवणूक करून हिंदुधर्मियांच्या जगातील सर्वांत माेठ्या साेहळ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन महापाैर हिमगाैरी आहेर-आडके, उपमहापाैर विलास शिंदे व महापालिका आयु्नत मनीषा खत्री यांनी केले.
आगामी कुंभमेळ्यासाठी नाशिकमध्ये हजाराे काेटींचे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. त्यास शासनाकडून निधी दिला जात असला, तरी आपल्या हिश्श्याची र्नकम देण्यासाठी महापालिकेने कर्जराेख्यांच्या माध्यमातून निधी उभारणीचा मार्ग स्वीकारला आहे. त्यात डिसेंबरमध्ये नाशिक महापालिकेने क्लीन गाेदावरबाँड्समधून 200 काेटी रुपये उभारले हाेते. आता प्रत्येकी एक हजार रुपये दर्शनी मूल्य असलेल्या सूचीबद्ध, करपात्र, प्रतिदेय आणि आणि अपरिवर्तनीय हरित महापालिका कर्जराेख्यांची विक्री केली जाणार आहे.
हे कर्जराेखे प्रत्येकी 125 रुपये अंकीत मूल्यांचे आठ स्वतंत्रपणे हस्तांतणीय व प्रतिदेय मुख्य भाग समाविष्ट आहेत.
हे कर्जराेखे खरेदीसाठी दाेन मार्च ही अंतिम मुदत आहे. वार्षिक 8.05 ट्नके दराने परतावा देय आहे. या कर्जराेख्यांना एए प्लस असे मूल्यांकन देण्यात आले आहे. किमान तीन ते 10 वर्षे अशा कालावधीसाठी वेगवेगळ्या भागांत (स्ट्रीप) ते खरेदी करता येतील. अर्जदाराला किमान 10 हजार रुपयांची (10 स्ट्रीप) गुंतवणूक करावी लागेल, अशी माहिती महापालिकेकडून देण्यात आली. हे बिगर परिवर्तनीय कर्जराेखे राष्ट्रीय शेअर बाजार आणि मुंबई शेअर बाजारात सूचिबद्ध करणे प्रस्तावित आहे. कर्जराेख्यांचा मूळ आकार 100 काेटी असून, 100 काेटींपर्यंतचा अतिर्नित नाेंदणी राखून ठेवण्याच्या पर्यायासह 200 काेटींपर्यंतचा असू शकताे. कर्जराेख्याचे व्यवहार डिमॅट स्वरूपातच असतील. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर याचे वाटप केले जाणार आहे.यावेळी संस्थात्मक गुंतवणूकदार 60 ट्नके (130 काेटी), बिगर संस्थात्मक 25 ट्नके (50 काेटी) आणि सामान्य गुंतवणूकदारांसाठी (15 ट्नके) 30 काेटी या प्रकारे गुंतवणूक करता येणार असल्याचे आयु्नत खत्री यांनी सांगितले.