महाड येथील ऐतिहासिक चवदार तळ्याच्या सुशाेभीकरणाचे 20 मार्चला भूमिपूजन : शिरसाट

    26-Feb-2026
Total Views |
 
 
 
mahad
महाडमधील ऐतिहासिक चवदार तळे सत्याग्रहाच्या 99व्या वर्धापन दिनानिमित्त 20 मार्चला शासन स्तरावर विविध कार्यक्रम आयाेजिण्यात येणार असून, याचदिवशी चवदार तळ्याच्या सुशाेभीकरणाच्या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी 55 काेटींच्या निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून, वर्धापन दिन साेहळा व भूमिपूजन कार्यक्रमाचे काटेकाेर नियाेजन करण्याचे निर्देश सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिले आहेत. ऐतिहासिक चवदार तळे सत्याग्रहाच्या 99व्या वर्धापन दिनानिमित्त शिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक घेण्यात आली.
 
या बैठकीस राेजगार हमी याेजना मंत्री भरत गाेगावले, विभागाचे प्रधान सचिव डाॅ. हर्षदीप कांबळे, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर संशाेधन व प्रशिक्षण संस्थेचे (बार्टी) महासंचालक सुनील वारे, सहसचिव साेमनाथ बागुल, सहायक आयु्नत सुनील जाधव, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी धनंजय काेळेकर, तहसीलदार महेश शिताेळे यांच्यासह संबंधित संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित हाेते. महाड चवदार तळ्याच्या सुशाेभीकरणामुळे या ऐतिहासिक स्थळाला नवे वैभव प्राप्त हाेणार असल्याने संबंधित यंत्रणांनी कार्यक्रमाचे शिस्तबद्ध नियाेजन करावे. या वर्धापन दिनानिमित्त समता आणि बंधुत्वाचा संदेश अधिक सक्षम करण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे त्यांनी नमूद केले.