डिजिटल अरेस्टच्या विराेधात माेहीम राबवणार : मुख्यमंत्री

    26-Feb-2026
Total Views |
 
 
CM
 
काेणालाही डिजिटल अरेस्ट करता येत नाही. अशा प्रकारचा काॅल, मेसेज किंवा व्हिडिओ काॅल आल्यास ताे फसवणूक असल्याने डिजिटल अरेस्टचा फाेन आल्यास नागरिकांनी तत्काळ 1930 या सायबर हेल्पलाइनवर संपर्क साधावा.अशा प्रकरणात जनजागृतीसाठी राज्य आणि केंद्राकडून माेठ्या प्रमाणात माेहीम राबवली जात असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत प्रश्नाेत्तरांच्या वेळी सांगितले.राज्यात विशेषतः मुंबई आणि अहिल्यानगर शहरात डिजिटल अरेस्ट आणि ऑनलाइन फसवणुकीद्वारे हाेत असलेल्या लूट प्रकरणांबाबत आमदार अबू आझमी यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला हाेता. अलीकडे काही लाेक पाेलीस अधिकारी, कस्टम अधिकारी असल्याचे भासवून डिजिटल अरेस्टची भीती दाखवत आहेत; तसेच ते लाेकांना घाबरवून माेठी र्नकम ऑनलाइन ट्रान्सफर करण्यास भाग पाडत आहेत.
 
अशा प्रकरणांत नागरिकांसह उच्चपदस्थ निवृत्त अधिकारीही फसले आहेत. एक निवृत्त आयएएस अधिकारी आणि नाैदलातील वरिष्ठ अधिकाऱ्यानेही भीतीपाेटी पैसे गमावले आहेत. या फसवणुकीचे जाळे विदेशातून चालवले जाते, तर देशातील लाेक फ्नत हँडलर हणून काम करतात, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.राज्यात सायबर गुन्ह्यांवर नियंत्रणासाठव्यापक यंत्रणा उभारण्यात आली असून, जर काेणी चुकीने पैसे ट्रान्सफर केले असतील आणि तत्काळ 1930 वर कळवले तर बँकांच्या समन्वयातून त्या रकमा गाेठवणे शक्य असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.राज्य आणि केंद्र सरकारकडून याबाबत जनजागृती माेहीम राबवली जात आहे. जाहिराती, रिंगटाेन आणि विविध माध्यमांतून डिजिटल अरेस्ट फसवणुकीबाबत सतत सूचना दिल्या जात आहेत. तरीही अनेकजण या जाळ्यात अडकत आहेत. त्यामुळे नागरिकांनी जागरूक राहावे, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.