चीनमध्ये सर्वांत माेठी बाैद्ध संस्था, मायनस 30 डिग्री मध्ये 20 हजार लाेक राहतात

    26-Feb-2026
Total Views |
 

china 
चीनच्या लारुंग खाेऱ्यामध्ये 13,000 फूट उंचीवर असलेली लारुंग गार जगातील सर्वात माेठी बाैद्ध संस्था मानली जाते. नुकत्याच झालेल्या बर्फवृष्टीनंतर इथे तापमान मायनस 30 डिग्रींपर्यंत पाेहाेचले हाेते. खाेऱ्यात डाेंगरांच्या उतारावर हजाराे लाकडी घरे एकाशेजारी एक बांधलेली आहेत. बाैद्ध परंपरेत पवित्र मानले जात असल्याने इथल्या घरांच्या भिंती आणि छत लाल रंगाने रंगविलेल्या असतात. गडद रंगाची असल्याने ते सूर्यप्रकाशातील उष्णता अपेक्षेपेक्षा जास्त शाेषून घेतात. त्यामुळे थंड हवामानात घरांमध्ये जास्त तापमान कायम राहते. त्याबराेबरच लाकडाची संरचना, उतार असलेली छते, अंतर्गत उष्णता आणि दाट वस्ती असल्याने छतांवर बर्फ जमा हाेत नाही. याच कारणांमुळे संपूर्ण खाेरे बर्फाने झाकलेले असले तरी छते स्वच्छ दिसून येतात. पूर्वी इथे 40,000 पेक्षा जास्त भिक्षू राहात हाेते. सध्या इथे सुमारे 20,000 लाेक राहतात.