सागरी किनारा मार्ग आणि महालक्ष्मी रेसकाेर्स मिळून 300 एकर जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे मुंबई सेंट्रल पब्लिक पार्क विकसित करण्यात येणार असून, या उद्यानाचा काेणत्याही स्वरूपाचा व्यावसायिक वापर केला जाणार नाही.वाहनतळ, स्वच्छतागृहे यांसारख्या सुविधांसाठी केवळ देखभाल शुल्क आकारले जाईल, अशी ग्वाही मुंबई महापालिकेचे आयु्नत भूषण गगराणी यांनी दिली.महालक्ष्मी रेसकाेर्सवरील सुमारे 120 एकर क्षेत्र आणि जवळच असलेल्या किनारी रस्ता प्रकल्पातील सुमारे 175 एकर असे संपूर्ण मिळून जवळपास 300 एकर क्षेत्रावर आंतरराष्ट्रीय दर्जाचे मुंबई सेंट्रल पब्लिक पार्क महापालिका विकसित करणार आहे. या उद्यानाबाबत दक्षिण मुंबईतील साऊथ मुंबई रेसिडेंट असाेसिएशनने कार्यक्रम आयाेजिला हाेता. या कार्यक्रमात आयु्नत गगराणी यांनी प्रस्तावित उद्यानाबाबत सादरीकरण केले. यावेळी खासदार मिलिंद देवरा उपस्थित हाेते.
प्रस्तावित बांधकाम केवळ तळमजल्यापुरते मर्यादित असेल.घाेड्यांच्या शर्यतीदरम्यान दृश्यात अडथळा येऊ नये म्हणून चार फुटांपेक्षा जास्त उंचीचे बांधकाम हाेणार नाही. एक भाग कार्यक्रमांसाठी राखीव ठेवला जाईल.रेसकाेर्स परिसर भविष्यातही नागरिकांसाठी खुला राहील, असे आयु्नतांनी स्पष्ट केले.रेसकाेर्सवरील या उद्यानाच्या प्रकल्पाबाबत अद्याप आराखडा तयार करण्याचे काम सुरू असून, विविध बाबींचा व्यवहार्यता अभ्यास अद्याप पूर्ण झालेला नाही. अंतिम आराखडा तयार झाला नसल्याचे त्यांनी सांगितले. भूमिगत वाहनतळाबाबत महापालिकेने निविदा मागवल्यानंतर भूमिगत बांधकाम करण्यास विराेध हाेऊ लागला आहे. त्यामुळे या संवाद सभेचे आयाेजन करण्यात आले हाेते. आराखड्यामध्ये उद्यान, क्रीडांगण आणि विरंगुळ्याची ठिकाणे असे तीन मुख्य भाग असतील, असेही सादरीकरणादरम्यान सांगण्यात आले.