राज्यात गुंतवणुकीसाठी ऑस्ट्रेलियाच्या इव्हाॅल्वचा राज्य शासनाशी सामंजस्य करार

    26-Feb-2026
Total Views |
 
 
Aus
 
ऑस्ट्रेलियाची इव्हाॅल्व कंपनी राज्यात गुंतवणूक करण्यासाठी उत्सुक आहे.नवी मुंबई, पुणे आणि नागपूर परिसरात कंपनी जवळपास 300 काेटींची गुंतवणूक करणार आहे. या गुंतवणुकीतून जवळपास 1075 जणांना राेजगार मिळेल.त्यासाठी कंपनीने राज्य शासनासाेबत सामंजस्य करार केल्याची माहिती उद्याेग विभागाने दिली आहे. या करारांचे आदान-प्रदान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत विधान भवनात करण्यात आले. यावेळी कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी कंपनीच्या गुंतवणुकीबाबत माहिती दिली. यावेळी उद्याेग विभागाचे सचिव डाॅ. पी. अन्बळगन, मुख्यमंत्र्यांचे गुंतवणूक सल्लागार काैस्तुभ धवसे, इव्हाॅल्व कंपनीचे कंट्री हेड आदित्य शर्मा, कंपनीच्या भारतीय सहभागीदार असलेल्या एम्प्रेसेंड उद्याेगसमूहाचे अध्यक्ष रुस्तम केरावाला, वरुण गुप्ता, उद्याेग विभागाचे सहसचिव श्रीकांत पुलकुंडवार आदी उपस्थित हाेते.