पिंट ऑफ व्ह्यू अशा अनाैपचारिक ठिकाणी व्याख्याने आयाेजित करते,
जिथे लाेक खातात, पितात आणि बराेबरीने ज्ञान मिळवतात.
संध्यानंद.काॅम
रात्री बंगळुरूच्या काेरमंगला येथील एका बारमध्ये एक शास्त्रज्ञ, एक पत्रकार आणि एक गीतकार एकत्र येतात - पण ते दारू पिण्यासाठी नाही, तर व्याख्यानासाठी. पूर्वी फक्त निमंत्रित परिषदांमध्ये शेअर केले जाणारे ज्ञान आता एका पिंटवर (पेयावर) ओतले जात आहे, ज्यामुळे पबचे रूपांतर एका वर्गात झाले आहे. पिंट ऑफ व्ह्यू ही भारतभरातील पब आणि बारमध्ये आयाेजित केली जाणारी एक नवीन व्याख्यानमाला आहे.
बंगळुरूच्या कब्बन रीड्स मागील जाेडी हर्ष स्नेहंशू आणि श्रुती साह यांनी हा उपक्रम सुरू केला आहे. अमेरिकेतील लेक्चर्स ऑन टॅप चळवळीतून त्यांनी प्रेरणा घेतली आहे.
व्यापकता : पिंट ऑफ व्ह्यूंचे पहिले सत्र ऑगस्ट 2025 मध्ये पार पडले, ज्यामध्ये वन्यजीव संवर्धनवादी आणि संशाेधक राेहित चक्रवर्ती यांनी वटवाघळांवर सत्र घेतले हाेते.
प्रेक्षकांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे संस्थापकांना याचा विस्तार करण्यास प्राेत्साहन मिळाले. तेव्हापासून, या जाेडीने भारतीय कापडाचा इतिहास आणि भारताचे वाढते हवामान संकट, न्यूराेसायन्स आणि खगाेलशास्त्रापर्यंत विविध विषयांवर व्याख्याने आयाेजित केली आहेत.
स्नेहंशू स्पष्ट करतात की, आम्हाला अशा अनेकांची बाैद्धिक पाेकळी जाणवली जे अनेक वर्षांपूर्वी काॅलेजला गेले हाेते.
ज्यांनी कला शाखेचा अभ्यास केला, त्यांना विज्ञानावरील व्याख्यानांना उपस्थित राहता येत नव्हते आणि याउलट देखील घडत हाेते. जरी सार्वजनिक व्याख्याने असली तरी त्यांचे मार्केटिंग कमी असते.
बार आणि कॅफेसारख्या अनाैपचारिक जागा निवडून आम्ही ज्ञानी लाेकांना एकत्र आणताे. र्पिंट ऑफ व्ह्यू पारंपरिक शैक्षणिक क्षेत्राच्या जडपणाला आव्हान देते. येथे लाेक खाण्या-पिण्यासाेबतच व्याख्यानाच्या दरम्यान माेकळेपणाने सहभागी हाेऊ शकतात. व्याख्याता आणि श्राेते यांच्यातील एकत्र येण्यामुळे येथे मुक्त संवादाला वाव मिळताे.
विविधता: साह यांच्या मते, येथील प्रेक्षक प्रामुख्याने 25 ते 40 वयाेगटातील आहेत. या गर्दीत शैक्षणिक तज्ज्ञ, संशाेधक, आयटी व्यावसायिक, वकील, सनदी अधिकारी, सीए, उद्याेजक आणि सरकारी अधिकारी यांचा समावेश असताे. अमृता ही एक नियमित उपस्थित राहणारी महिला म्हणते की, मी नियमित अभ्यासाबाहेरील अनेक विषयांवरील व्याख्याने येथे ऐकली आहेत. मी उपस्थित राहिलेले पहिले व्याख्यान हमिंगबर्ड्सवंर हाेते - असा विषय जाे मला एरवी कधीच समजला नसता. विशेष म्हणजे ते कंटाळवाणे नव्हते; संशाेधकाने अनुभवातून, प्रयाेगातून आणि मनापासून रस वाटणारी माहिती शेअर केली. पिंट ऑफ व्ह्यू आपल्या व्याख्यात्यांना मानधन देखील देते.