कृषीसाठी एआय परिषद घेणारे महाराष्ट्र पहिले राज्य

एआय फाॅर अ‍ॅग्री परिषदेच्या उद्घाटनावेळी मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन

    24-Feb-2026
Total Views |
 
AI
 
मुंबई, 23 फेब्रुवारी (आ.प्र.) :
 
‘शेतकऱ्याने डिजिटल सेवांचा आत्मविश्वासाने वापर केला पाहिजे. शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या विविध डिजिटल अ‍ॅपमुळे शेतकरी त्यांच्या भाषेत संवाद साधून शेतीविषयक प्रश्नांचे उत्तर त्वरित मिळवू शकतात. महा-एआय इनाेव्हेशन सेंटरद्वारे विद्यापीठे, संशाेधन संस्था, उद्याेगांना एकत्र आणून सक्षम डिजिटल परिसंस्थेद्वारे शेतकऱ्यांच्या जीवनमानात सुधारणा करण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न आहे. शेतकऱ्यांच्या व्यापक हितासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता परिषद घेणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य आहे,’ असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे सांगितले.
 
महाराष्ट्र कृषी-कृत्रिम बुद्धिमत्ता धाेरण 2025-2029 धाेरणांतर्गत जागतिक कृषी क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्ता परिषद आणि गुंतवणूकदार शिखर संमेलनाचे (एआय फाॅर अ‍ॅग्री) उद्घाटन करताना मुख्यमंत्री बाेलत हाेते. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डाॅ. जितेंद्र सिंह, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, राेजगार हमी याेजना मंत्री भरत गाेगावले, कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल, अपर मुख्य सचिव (कृषी) विकासचंद्र रस्ताेगी, कृषी आयु्नत सूरज मांढरे, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प संचालक परिमल सिंह, जागतिक बँकेचे कार्यकारी संचालक परमेश्वरन अय्यर आदी उपस्थित हाेते.
महाराष्ट्राने जाहीर केलेली स्वतंत्र अ‍ॅग्री एआय पाॅलिसी स्वागतार्ह असून, इतर राज्यांनी त्याचे अनुकरण करावे, असे आवाहन डाॅ. जितेंद्र सिंह यांनी केले.
 
कृत्रिम बुद्धिमत्ता, ड्राेन, आयओटीसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाला शेतकऱ्यांच्या पारंपरिक ज्ञानाशी जाेडल्यास राज्याची शेती देशासह जगासाठी आदर्श ठरू शकते, असा विश्वास भरणे यांनी व्य्नत केला.
 
कृषी क्षेत्रातील एआय आधारित महत्त्वपूर्ण अ‍ॅप्स आणि डिजिटल प्लॅटफाॅर्मचे यावेळी मान्यवरांच्या हस्ते लाेकार्पण करण्यात आले. महाविस्तार (चरहरतखडढठ) व्हाॅइस टेलिफाेनी अ‍ॅप सादर करण्यात आले. एक स्टेप फाउंडेशन आणि जागतिक बँकेतील त्रिपक्षीय सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. नेदरलँड्समधील वॅगेनिंगेन विद्यापीठ आणि संशाेधन संस्था (डब्ल्यूयूआर) यांच्यासाेबत सामंजस्य यावेळी करार करण्यात आला.