राेबाेट करेल काम, वाॅलपेपर सारखा असेल टीव्ही

    24-Feb-2026
Total Views |
 
Robots
 
जगातील सगळ्यात माेठा आंतरराष्ट्रीय टेक इव्हेंट सीईएस 2026 नुकताच झाला.
यामध्ये राेबाेट, एआयचे अनेक प्राॅड्नट सादर झाले.
हे पाहून भविष्यातील साधनांची चाहूल लागते. याविषयी...  
 
 अमेरिकेतील नेवादामध्ये झाला कंझ्युमर इले्नट्राॅन्निस शाे
 जगातील पहिला भावनात्मक स्वरूपातील बुद्धिमान कृत्रिम पाळीव प्राणी (एआय पेट) सादर केला
 घरात काम करू शकणारा राेबाेटही येथे दाखविण्यात आला 
 
संध्यानंद.काॅम
 
अमेरिकेच्या नेवादा इथे आयाेजित केलेल्या सगळ्यात माेठ्या कंझ्युमर इले्नट्राॅन्निस शाेमध्ये जागतिक कंपन्यांनी आपले नवनवीन इनाेवेटिव उपकरणे, तंत्रज्ञान सादर केले. त्यामध्ये जगातील पहिला भावनात्मक स्वरूपातील बुद्धिमान कृत्रिम पाळीव प्राणी (एआय पेट) सादर झाले. तसेच, स्मार्ट चाकू, टीव्ही आणि अनेक नवीन तंत्रज्ञानाने बनलेले गॅझेटस येथे दाखविण्यात आले.
 
खिशात बसणारा एआय पाळीव प्राणी टेकअवे एआय नावाच्या कंपनीने स्वीकार नावाचा एआय पाळीव प्राणी(पेट) सादर केला. हा इतर डिजिटल पेटपेक्षा वेगळा हाेता. याला जगातील पहिला भावनात्मक रुपात बुद्धिमान, शारीरिक रूपाने विकसित हाेणारा, कृत्रिम पाळीव प्राणी म्हटले जात आहे. हा अंड्यातून बाहेर येऊन वृद्ध हाेण्यापर्यंत वाढताे. हा तुम्ही सांगाल ते ऐकताे. तुमच्यासाठी गाेष्टी लक्षात ठेवताे. त्याचे पालन-पाेषण जसे हाेईल, त्याप्रमाणे यामध्ये बदलही घडून येतात. याला स्वस्थ राहण्यासाठी आणि विकसित हाेण्यासाठी नियमित देखभालीची गरजही आहे.
 
ओनेराे एच-1 एआय घरगुती राेबाेट स्विचबाेट नावाच्या कंपनीने ओनेराे एच-1 घरगुती राेबाेट सादर केला. हा सगळ्यात साेपा घरगुती राेबाेट असल्याचे कंपनी सांगत आहे. या तंत्रज्ञानामध्ये एआय आहे. हे काळानुसार शिकत राहते.
 
नेराे विविध वस्तूंना ओळखू शकताे. पकडू शकताे. ढकलूही शकताे. तसेच, व्यवस्थितही करू शकताे. याला हात आणि चाक असल्याने हा घरात आरामात फिरू शकताे. हा राेबाेट स्विचबाेट कंपनीने बनविलेल्या अन्य स्मार्ट उपकरणां बराेबरही काम करताे, असे कंपनीने नमूद केले.

एलजीची अल्ट्रा थिन वाॅलपेपर टीव्ही एलजीने ओएलईडी इवाे डब्ल्यू - 6 वाॅलपेपर टीव्ही सादर केला. हा टीव्ही केवळ 9 मिमी जाड आहे. भिंतीवर लावल्यावर त्याची जाडी जवळजवळ अदृश्य हाेते. झीराे कने्नट बाॅ्नसच्या माध्यमातून व्हिडियाे आणि ऑडियाे वायरलेस पाठवता येतात. त्यामुळे केबलची तगतग राहणार नाही. यामध्ये ओएलईडी स्क्रीन, 4 के रिझाॅल्यूशन, 165 हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि गेमिंग सपाेर्ट दिला आहे. या अल्ट्रा थिन टीव्ही स्क्रीनला डिजिटल आर्टप्रमाणेही वापरता येते.