ब्राऊझर म्हणजे न्नकी काय, ते कसे काम करते, त्याच्याकडून आपण कशाप्रकारे आपले काम करून घेऊ शकताे, त्याची आपल्याकडे स्पष्ट माहिती नसते.
जेव्हा इंटरनेट सुरू झाले तेव्हा इंफर्मेशन सुपरहायवे हा शब्द रूढ हाेता. त्याचाच आधार घेऊन असे म्हणू शकताे की, इंटरनेटच्या अफाट दुनियेत ठराविक ठिकाणी पाेहाेचण्यासाठी ज्या खुणा असतात, तिथे पाेचण्यासाठी ब्राऊझरचा आपण वाहन म्हणून उपयाेग करू शकताे किंवा आणखी साेपे म्हणजे ब्राऊझरला आपण ब्रिज म्हणू शकताे.
इंटरनेट म्हणजे जगातल्या असंख्य काॅम्प्युटरना जाेडलेले एक विशाल जाळे आहे. इंटरनेटवर आपल्याला जे काही पाहायचे आहे, ते सर्व इंटरनेटवरील सर्व्हरवर साठवलेले असते. वेबसाइट असाे की अॅप, त्यातील सर्व माहिती म्हणजे टेक्स्ट, ईमेज, व्हिडिओ हे सर्वच या सर्व्हरमध्ये साठवलेले असते. आपल्या स्मार्टफाेन किंवा लॅपटाॅप वा काॅम्प्युटरमधील सर्व माहिती या सर्व्हरपर्यंत पाेहाेचवण्याचे काम ब्राऊझर साेपे करते. फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हाॅट्सअॅप किंवा गुगल ड्राईव्हसारख्या वेगवेगळ्या अॅप्समध्ये आपणास जे पाहायचे आहे ते सर्व त्या अॅप्समध्ये साठवलेले असते, ते आपणापर्यंत ब्राऊझरमार्फत पाेहाेचते. तुम्हाला कदाचित माहित असेल, सर्वांत पहिला ब्राऊझर वर्ल्ड वाईड वेब (डब्लूडब्लूडब्लू) म्हणून ओळखला जात हाेता.
आपण त्यालाच इंटरनेट म्हणत हाेताे. त्यानंतर 1990 मध्ये सर टीम बर्नर्स ली नावाच्या संशाेधकाने एका काॅम्प्युटरला दुसऱ्या काॅम्प्युटरशी जाेडण्याचे ब्राऊझरचे तंत्रज्ञान शाेधून काढले. वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन वेगवेगळी माहिती काढणाऱ्यास ब्राऊझर म्हणतात.
माेझेक, नेटस्केप, नेविगेटरसारखे ब्राऊझर नंतर विकसित झाले.
त्यानंतर मायक्राेसाॅफ्ट कंपनीने इंटरनेट एक्स्प्लाेअरर विकसित केले. त्यानंतर कंपन्यांनी पर्सनल काॅम्प्युटरमध्ये विंडाेज ऑपरेटिंग सिस्टिमबराेबर ब्राऊझर देण्यास सुरुवात केली. आताच्या फास्ट जमान्यात, वेगवेगळ्या स्मार्टफाेन कंपन्या स्वत:चा ब्राऊझर विकसित करीत आहेत व आपण आपल्या स्मार्टफाेनवरसुद्धा इंटरनेटवर फेरफटका मारू शकताे. आपण एकाच विंडाेमध्ये अनेक टॅब देऊन अनेक वेबपेजवर जाऊ शकताे. त्यामुळे सर्फिंग खूपच फास्ट हाेते.
ज्या वेबपेजवर आपणास वारंवार जावे लागेल, त्याचा बुकमार्क सेव केले की, त्या वेबसाइटवर लगेच जाता येते. तसेच आपण ज्या वेबसाइटला व्हिजिट केले आहे, त्याची हिस्ट्रीदेखील पाहू शकताे.
ही हिस्ट्रीदेखील वेळाेवेळी क्लीन करून आपण आपले इंटरनेट फास्ट करू शकताे.