मुंबई, 22 फेब्रुवारी (आ.प्र.) : पश्चिम उपनगरांतील वाहतूक काेंडी साेडवण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या वांद्रेवर्साेवा सागरी सेतूचे गेल्या सात वर्षांत केवळ 30 ट्नकेच काम झाले आहे. आता या प्रकल्पाच्या कामाला गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
त्यानुसार राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) कंत्राटदाराला मनुष्यबळ आणि यंत्रसामग्री वाढवून कामांना गती देण्यास सांगितले आहे.
एमएसआरडीसीने 17.7 किमी.च्या सी-लिंक उभारणीचे काम हाती घेतले आहे. त्यानुसार सागरी मार्गावर एकूण 8 मार्गिका बांधल्या जाणार आहेत. यातील मुख्य सागरी सेतू 9.60 किमी.चा असून, ताे समुद्रात 9000 मीटर आतमध्ये उभारला जाईल. सध्या प्रकल्पाचे 30 ट्नके काम पूर्ण झाले आहे. एमएसआरडीसीने समुद्रातील पुलाच्या उभारणीच्या कामाला गती दिली आहे. या प्रकल्पाचे काम 2019 मध्ये सुरू झाले हाेते. त्यावेळी 2025 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण हाेणे अपेक्षित हाेते. मात्र, काेराेनामुळे लागू झालेल्या टाळेबंदीमुळे प्रकल्पाचे काम थांबले हाेते. त्यातच या प्रकल्पाचा कंत्राटदार असलेला रिलायन्स इन्फ्रा आर्थिक गर्तेत सापडला. त्यानंतर कामाला पुन्हा सुरुवात झाली.
गेल्या चार वर्षांत प्रकल्पाचे केवळ 30 ट्नकेच काम पूर्ण हाेऊ शकले आहे.
त्यामुळे आता कंत्राटदाराला कामाची गती वाढवण्यासाठी यंत्रणा आणि मनुष्यबळ अधिक लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. वांद्रे-वर्साेवा सी-लिंकच्या कामातील अडथळे आता जवळपास संपले आहेत. त्यामुळे या प्रकल्पाच्या कामांना गती दिली जात आहे.