शिवछत्रपतींच्या मार्गावर चालणे हाच विकासाचा मार्ग‘

    22-Feb-2026
Total Views |
 
 

shivaji 
छत्रपती शिवरायांनी दिलेला मार्ग हाच सर्वांगीण विकासाचा मार्ग आहे. त्यांच्या कार्याचा आदर्श जगासमाेर ठेवण्यासाठी 2030 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची 400वी जयंती भव्य आणि जागतिक स्तरावर साजरी केली जाईल,’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.किल्ले शिवनेरीवर आयाेजित शिवजन्माेत्सव साेहळ्याप्रसंगी ते बाेलत हाेते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार, आमदार शरद साेनवणे, काेल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पाेलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, अभिनेता रितेश देशमुख आदी उपस्थित हाेते.छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीतून उभे राहिलेले स्वराज्य आजही सुशासनाची प्रेरणा देते. शिवरायांच्या विचारांवर चालत बलशाली व स्वाभिमानी महाराष्ट्र घडवण्याचा निर्धार शिंदे यांनी व्य्नत केला.
 
सुनेत्रा पवार यांनीही मनाेगत व्य्नत केले. प्रारंभी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवजन्मस्थानी पारंपरिक वेशातील महिलांनी शिवरायांची महती सांगणारा पाळणा गायला. राष्ट्रगीत तसेच गर्जा महाराष्ट्र माझा या राज्यगीताची धून पाेलीस बँड पथकाने वाजवून सलामी दिली. त्यानंतर पाेलीस पथकाने बंदुकीच्या तीन फैरी झाडून छत्रपती शिवरायांना मानवंदना दिली. यावेळी जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांच्या पथकाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील प्रसंग सुंदर पद्धतीने सादर केले.त्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी बाल शिवाजी व माँ जिजाऊंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची पालखी वाहिली.मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रगतशील शेतकरी दिवंगत पंकज वामन (मरणाेत्तर), खारखर येथील टाटा कॅन्सर रुग्णालयाचे विभागप्रमुख डाॅ. विनाेद हांडे, लेफ्टनंट अजिंक्य मेहेर, माजी पंचायत समिती सभापती शिवाजीराव खैरे आणि उपलेफ्टनंट श्रुतिका ताथवडे यांना ‘शिवनेर भूषण’ पुरस्कार प्रदान करण्यात आले.