कराड-चिपळूण राष्ट्रीय महामार्गाचे काम बराच काळ रखडले असून, या रस्त्यावरील पाटण एसटी स्थानक परिसरातील अतिक्रमणे हटवून तात्काळ कामे सुरू करावीत व रस्त्याचे काम पूर्ण करावे, असे निर्देश पालक मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले. पाटण तालुक्यातील विविध विकासकामांचा आढावा देसाई यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे घेतली. या बैठकीला जिल्हाधिकारी संताेष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पाेलीस अधीक्षक तुषार दाेशी, उपवनसंरक्षक अमाेल सातपुते, मुंबईचे राष्ट्रीय महामार्ग प्रादेशिक कार्यालयाचे मुख्य अभियंता संताेष शेलार, पाेलीस उपअधीक्षक अतुल सबनीस, महावितरणचे अभियंता रासकर, जिल्हा नियाेजन अधिकारी यशवंत थाेरात आदी उपस्थित हाेते. कराड-चिपळूण राष्ट्रीय महामार्गाचे काम बऱ्याच काळापासून रखडले आहे. या कामात प्रगती हाेत नसल्याने देसाई यांनी नाराजी व्य्नत केली. एसटीने अतिक्रमण काढण्याबाबत आवश्यक ती कारवाई करावी आणि रस्ता कामासाठी उपलब्ध करून द्यावा, असे निर्देश देऊन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने हे काम त्वरित पूर्ण करून द्यावे, असे देसाई यांनी सांगितले.दाैलतनगर परिसरात 150 किलाेवाॅटचे साेलर पॅनेल बसवण्यात आले आहेत.