दिल्लीत शिवजयंतीचा साेहळा उत्साहात

    22-Feb-2026
Total Views |
 

DL 
 
जय भवानी, जय शिवाजी...चा गगनभेदी जयघाेष, ढाेल-ताशांचा गजर, तुतारींचा निनाद आणि शाहिरी पाेवाड्यांच्या साथीने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती राजधानीत उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी लष्करी तुकडीने छत्रपती शिवाजी महाराजांना विशेष मानवंदना दिली. दिल्लीतील शिवजयंती राष्ट्राेत्सव समितीतर्फे कस्तुरबा गांधी मार्गस्थित नवीन महाराष्ट्र सदनात साेहळ्याचे आयाेजन करण्यात आले हाेते. संभाजीराजे छत्रपतींच्या प्रमुख उपस्थितीत आणि खा. विशाल पाटील, निवासी आयु्नत तथा सचिव आर. विमला, निवासी आयु्नत गुंतवणूक सुशील गायकवाड, माहिती संचालक हेमराज बागुल यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्माेत्सव, पाळणा पूजन आणि पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी शिवकालीन दर्शिका-2026 या कॅलेंडरचे प्रकाशन संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते करण्यात आले. नाशिकचे शिवराय ढाेल पथक, लेझीम, वारकरी दिंडी आणि झेंडा पथकाच्या निनादात महाराष्ट्र सदन परिसरात भव्य शिव-शाेभायात्रा काढण्यात आली.